vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

बारावी परीक्षेचे गुणपत्रक-साहित्याचे वाटप सुरू 

बारावी परीक्षेचे गुणपत्रक-साहित्याचे वाटप सुरू

नांदेड प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या लातूर, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक व कोकण या विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार अधिकृत संकेतस्थळावर शनिवार 2 मे 2026 रोजी ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेचे गुणपत्रक तथा प्रमाणपत्र, स्थलांतर प्रमाणपत्र, तपशीलवार गुण दर्शविणारे शालेय अभिलेख यांचे वाटप संबंधित विभागीय मंडळामार्फत सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना सोमवार 25 मे 2026 रोजी सकाळी 11 वा. करण्यात आले आहे.

शाळा, कनिष्ठ महाविद्यालयामार्फत विद्यार्थ्यांना गुणपत्र तथा प्रमाणपत्र वाटप करण्यात येत आहे. याबाबत विभागीय मंडळांमार्फत सर्व उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांना सूचित केले आहे. लातूर विभागीय मंडळ कार्यकक्षेतील सर्व संबंधित प्राचार्य, विद्यार्थी, पालकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

शेतकऱ्यांच्या हक्काचे संरक्षण करण्यासोबतच कृषी क्षेत्राच्या बळकटीकरणाकरिता राज्य शासन कटिबद्ध- उपमुख्यमंत्री अजित पवार

बचत गटांना अर्थसहाय्य देऊन विकास कार्यक्रमांना गती द्या : जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक के. के. सिंग

vishwatmaklokswamivarta

राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन- ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे…

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमांतर्गत फेलोंना मिळणार‘आयआयटी’ बॉम्बेचे मार्गदर्शन सार्वजनिक धोरण प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी राज्य शासन व ‘आयआयटी’ बॉम्बेमध्ये सामंजस्य करार

शिवसेना युवासेना प्रमुख पदाधिकार्‍यांच्या बैठकीचे व नवनियुक्त जिल्हाप्रमुखांच्या सत्कारांचे आयोजन – जास्तीत-जास्त शिवसेना पदाधिकार्‍यांनी उपस्थित राहावेअंबड, बदनापूर, जालना विधानसभा कार्यक्षेत्रातील पदाधिकार्‍यांनी बैठकीला उपस्थित राहावे – शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे वतीने आवाहन –

मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात मंत्री छगन भुजबळ कोर्टात जाणार

vishwatmaklokswamivarta