vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

जिल्हा परिषदेतील वर्ग-३ कर्मचाऱ्यांची ‘सेवाप्रवेशोत्तर परीक्षा’ 4 व 5 जुलै रोजी कोकण विभागीय आयुक्तांचे उमेदवारांना संपर्क साधण्याचे आवाहन

जिल्हा परिषदेतील वर्ग-३ कर्मचाऱ्यांची ‘सेवाप्रवेशोत्तर परीक्षा’ 4 व 5 जुलै रोजी कोकण विभागीय आयुक्तांचे उमेदवारांना संपर्क साधण्याचे आवाहन

      नवी मुंबई, प्रतिनिधी- कोकण विभागातील जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत असणाऱ्या वर्ग-३ च्या कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र जिल्हा परिषद, जिल्हा सेवा सेवाप्रवेशोत्तर परीक्षा 2025 चे वेळापत्रक जाहीर झाले असून ही परीक्षा आगामी दिनांक 4 आणि 5 जुलै 2026 रोजी कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांच्या मुख्यालयांच्या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती कोकण विभागीय आयुक्त कार्यालयाच्या विकास शाखेने दिली आहे.

 

            या परीक्षेसाठीची आवश्यक आवेदन पत्रे संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), यांच्याकडे प्राप्त होणार आहेत. त्यामुळे परीक्षेस बसू इच्छिणाऱ्या आणि पात्र असणाऱ्या सर्व उमेदवारांनी तातडीने आपल्या संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून आपली अर्ज प्रक्रिया वेळेत पूर्ण करून घ्यावी. परीक्षेच्या शेवटच्या क्षणी कोणतीही तांत्रिक किंवा प्रशासकीय अडचण निर्माण होऊ नये, यासाठी उमेदवारांनी सतर्क राहून वेळेत प्रशासनाशी समन्वय साधणे आवश्यक आहे

            सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या परीक्षेच्या तारखांची आणि प्रक्रियेची नोंद घ्यावी असे निर्देश कोंकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिले आहेत0000

संबंधित पोस्ट

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारतीय नौदलाने #INS_Satavahana येथे समुद्राच्या तळाशी विशेष योग सत्र आयोजित करून एक अनोखा उपक्रम राबवला.

जवखेडा येथील शेतकरी महिलेला तात्काळ नुकसान भरपाई द्या- शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरे यांचे महावितरणच्या उपअभियंत्यांना निवेदन..

बालविवाहाच्या घटना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखाव्यात- जिल्हाधिकारी अशोक काकडे- संबंधित यंत्रणांनी जिल्ह्यात बालविवाह प्रकरणे होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी राजेंद्र राख यांची निवड*

प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमांमध्ये नोव्हेंबर महिन्यात 1.40 लाख दंडात्मक वसूली व 46.5 किलो प्लास्टिक जप्त

vishwatmaklokswamivarta

महिलांचा कायदा व प्रशासनावर विश्वास वाढविणे महत्वाचे; अशा उपक्रमांमुळे महिलांना न्याय मिळण्यास मोठी मदत होईल – विजया रहाटकर राष्ट्रीय महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत नवी मुंबई येथे 28 प्रकरणांवर सुनावणी पूर्ण