vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

इंडियन ऑईल’च्या सीएसआर उपक्रमातून कूपर रुग्णालयास बायोकेमिस्ट्री ब्लड अ‍ॅनालायझर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘इंडियन ऑईल’च्या सीएसआर उपक्रमातून कूपर रुग्णालयास बायोकेमिस्ट्री ब्लड अ‍ॅनालायझर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            मुंबई, प्रतिनिधी : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांना अधिक जलद, अचूक आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल) च्या कार्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांतर्गत जुहू येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. आर. एन. कूपर महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयात पूर्णपणे स्वयंचलित अत्याधुनिक बायोकेमिस्ट्री ब्लड अ‍ॅनालायझर उपलब्ध करून देण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

            मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत सांगितले आहे की, राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना आधुनिक आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यास शासनाचे प्राधान्य आहे. कार्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमाच्या माध्यमातून सार्वजनिक रुग्णालयांना अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांची जोड मिळत असल्याने आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम होत आहे. यामुळे रुग्णांना जलद आणि अचूक सेवा देण्यास मदत होईल.

     मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे आधुनिकीकरण वेगाने सुरू असून, हा उपक्रम त्याच दिशेने उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या अत्याधुनिक यंत्रणेमुळे रुग्णालयाच्या निदान क्षमतेत मोठी वाढ होणार आहे. मोठ्याप्रमाणात रक्त तपासण्या अधिक वेगाने आणि अचूकपणे करता येणार आहेत. नियमित तसेच तातडीच्या बायोकेमिकल चाचण्या कमी वेळेत पूर्ण होणार असल्याने डॉक्टरांना त्वरित वैद्यकीय निर्णय घेणे अधिक सुलभ होणार आहे. परिणामी, रुग्णांना उपचार लवकर सुरू करण्यास मदत मिळणार असून आरोग्यसेवेची गुणवत्ता उंचावणार आहे.     मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील हजारो रुग्णांसाठी डॉ. आर. एन. कूपर रुग्णालय हे महत्त्वाचे सार्वजनिक आरोग्य केंद्र मानले जाते. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिक मोठ्या प्रमाणावर या रुग्णालयावर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत अत्याधुनिक बायोकेमिस्ट्री ब्लड अ‍ॅनालायझरची उपलब्धता ही सार्वजनिक आरोग्यसेवेला मोठा आधार ठरणार आहे.

   या उपक्रमामुळे प्रयोगशाळेतील कार्यपद्धती अधिक कार्यक्षम होणार असून अहवालांचा ‘टर्नअराउंड टाइम’ लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नमुन्यांचे विश्लेषण अधिक अचूकपणे करता येणार असल्याने उपचार प्रक्रियेलाही गती मिळणार आहे.

     इंडियन ऑईल कार्पोरेशन लिमिटेड या कंपनीच्या कार्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमाच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात सातत्याने करण्यात येणाऱ्या उपक्रमांमुळे सार्वजनिक आरोग्य संस्थांची क्षमता वाढत असून, नागरिकांना अधिक सक्षम व विश्वासार्ह वैद्यकीय सेवा उपलब्ध होत आहे.

0000

संबंधित पोस्ट

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विनम्र अभिवादन वाशी चौकातील अश्वारूढ शिवपुतळ्यास वनमंत्री ना.श्री.गणेश नाईक यांच्या हस्ते पुष्पमालिका अर्पण‘जय शिवाजी – जय भारत’ पदयात्रेत नागरिकांसह मोठ्या संख्येने युवकांचा उत्साही सहभाग..

vishwatmaklokswamivarta

उत्पादकता वाढविण्यासाठी मिशन नैसर्गिक शेती राबविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एल.आय.टी. माजी विद्यार्थी संघटनेचा ‘उडान’ कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

काढणीपश्चात प्रक्रिया युनिट घटकाचा लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांनी ऑफलाईन पध्दतीने अर्ज करावेत

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला रस्ते विकास, पाणी पुरवठा योजनेचा आढावाअतिक्रमण हटाव मुळे बेघर झालेल्या परिवारांना मोफत घरे देणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

महिला सुरक्षितता सर्व्हेक्षण करा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून विशेष मोहिम;मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे समितीकडून आवाहन