vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुक

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे ३१ मे रोजी रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे ३१ मे रोजी रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजन

मुंबई, प्रतिनिधी : लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर आधारित भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक कार्य संचालनालयांच्या वतीने रविवार, ३१ मे २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता मिनी थिएटर, रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे करण्यात आले आहे.

भारतीय इतिहासातील आदर्श राज्यकर्त्या, न्यायप्रिय प्रशासक आणि लोककल्याणासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनातील विविध प्रेरणादायी प्रसंग, त्यांचे सामाजिक कार्य, धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन, स्त्रीशक्तीचे दर्शन घडविणारे नेतृत्व तसेच राष्ट्रनिर्मितीतील त्यांचे योगदान या कार्यक्रमातून प्रभावीपणे उलगडण्यात येणार आहे.

नृत्य, संगीत, अभिनय आणि दृश्यरचनांच्या माध्यमातून साकारण्यात येणाऱ्या या भव्य प्रस्तुतीतून प्रेक्षकांना अहिल्यादेवींच्या जीवनसंघर्षाचा, प्रशासन कौशल्याचा आणि जनकल्याणकारी कार्याचा अनुभव घेता येणार आहे. ऐतिहासिक आशय आणि कलात्मक सादरीकरण यांचा संगम साधणारा हा कार्यक्रम सर्व वयोगटातील रसिकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.

या कार्यक्रमाचे दिग्दर्शन आणि नृत्यदिग्दर्शन सुप्रसिद्ध कलावंत शशीन मेस्त्री (नृत्येश्वर) यांनी केले असून, नेपथ्य, वेशभूषा, प्रकाशयोजना आणि कलासादरीकरणाच्या माध्यमातून अहिल्यादेवींच्या जीवनाचा वैभवशाली प्रवास रंगमंचावर साकारण्यात येणार आहे.

हा कार्यक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे.

या सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ रसिक, इतिहासप्रेमी, विद्यार्थी तसेच सर्व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

0000

संबंधित पोस्ट

कीर्तन: रुपेरी पडद्यावर इतिहास घडवणारा भव्य चित्रपट!दिग्दर्शक अतुल जगदाळे लवकरच घोषणा करण्याच्या तयारीत!

vishwatmaklokswamivarta

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारच्या ‘हाऊसफुल 5’ चित्रपटाची दुसऱ्या दिवशी  बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई…

नमुंमपा दिंडी स्पर्धा व एकपात्री अभिनय स्पर्धेची 15 सप्टेंबर रोजी विष्णुदास भावे नाट्यगृहात अंतिम फेरी

vishwatmaklokswamivarta

🎥 महालक्ष्मी सरस नवी मुंबई २०२६: रील चॅलेंज आता सुरू! 🏆मुंबई आणि नवी मुंबईतील कंटेंट क्रिएटर्स—तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी

इंडियाज गॉट लेटेंट नावाचा शो-करमणुकीच्या नावाखाली अश्लिलता रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना, यांच्यावर गुन्हा दाखल

vishwatmaklokswamivarta

६४ व्या महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवाच्या विभागीय पारितोषिक वितरण सोहळ्यात रंगकर्मींचा होणार सन्मान३० जून रोजी रवींद्र नाट्य मंदिर येथे हौशी मराठी नाट्य, बालनाट्य व प्रथम मराठी एकांकिका स्पर्धेतील पारितोषिक विजेत्यांचा गौरव