vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

म्हाडा नागपूर मंडळातील प्रकल्प तातडीने मार्गी लावा – गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

म्हाडा नागपूर मंडळातील प्रकल्प तातडीने मार्गी लावा – गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

मुंबई, प्रतिनिधी : म्हाडा नागपूर मंडळांतर्गत सुरू असलेले विविध विकास प्रकल्प आणि प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले. त्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत नागपूर मंडळातील विविध प्रकल्पांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

बैठकीस म्हाडा प्राधिकरणाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखडे तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी नागपूर मंडळातील रिक्त पदांच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला; तसेच चंद्रपूर येथील सार्वजनिक उद्यान प्रकल्पासाठी ईओआय प्रक्रिया, हायर परचेस योजनेअंतर्गत व्याजाच्या रकमेसाठी राबविण्यात येणारी अभय योजना, नवीन चंद्रपूर येथील सिमेंट काँक्रीट रस्ते विकास कामे, चंद्रपूर; तसेच वर्धा येथील वृद्धाश्रम प्रकल्प आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी संबंधित प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आढावा घेत आवश्यक प्रशासकीय कार्यवाही तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या प्रकल्पांची कामे निर्धारित कालावधीत पूर्ण व्हावीत, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करावे, असे त्यांनी सांगितले. तसेच प्रलंबित विषयांचा त्वरित निपटारा करून विकासकामांना गती देण्याबरोबरच प्रकल्पांच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करण्याचे निर्देशही डॉ. भोयर यांनी संबंधित विभागप्रमुखांना दिले

0000

संबंधित पोस्ट

जिल्हास्तरीय संस्कृत स्पर्धेत प्रणवी भिसेचा प्रथम क्रमांक.

vishwatmaklokswamivarta

विधान परिषद निवडणुकीतील 17 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस.🗳️

नव्या मुंबईत 23 ते 25 मार्च रोजी नवी मुंबई महापौर चषक 40+ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रेतून जलसंवर्धनाच्या कार्याला नवसंजीवनी देण्याचा संकल्प – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील-गोदा ते नर्मदा अहिल्यादेवी जलयात्रा’ ही प्रभावी ठरणार – प्रा. राम शिंदे

ग्रामीण भागात प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि जनजागृती मोहिमांमध्ये पुढाकार घ्यावा -वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी ‘इको-फ्रेंडली गणेश मूर्ती रंगरंगोटी महोत्सव’- मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगण येथे ८ सप्टेंबर रोजी महोत्सवाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta