vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त बुलढाण्यात भव्य सामूहिक योग प्रात्यक्षिकाचे आयोजन

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त बुलढाण्यात भव्य सामूहिक योग प्रात्यक्षिकाचे आयोजन

बुलढाणा प्रतिनिधी): निरोगी जीवनशैलीचा संदेश देणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त बुलढाणा जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, यासंदर्भातील नियोजन बैठक जिल्हा क्रीडा कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडानगरी, जांभरून रोड, बुलढाणा येथे संपन्न झाली.

संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून घोषित केल्यानंतर योगाचे महत्त्व जागतिक स्तरावर अधिक अधोरेखित झाले आहे. त्यानुषंगाने जिल्हास्तर आयोजन समितीच्या वतीने आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी भक्ती आंब्रे होत्या. यावेळी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद, नेहरू युवा केंद्राच्या दीक्षा पोमल, भारत स्काऊट गाईडचे जिल्हा संघटक, आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशांत लहासे तसेच योग क्षेत्रात कार्यरत विविध संस्था व संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते

बैठकीत यंदाचा १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन जिल्हाभर उत्साहात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हास्तरावर तसेच सर्व तालुकास्तरांवर शालेय विद्यार्थी, युवक-युवती आणि नागरिकांमध्ये योगाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी २१ जून २०२६ रोजी सकाळी ७ ते ७.४५ या वेळेत सामूहिक योग प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात येणार आहे.

जिल्हास्तरीय मुख्य कार्यक्रम जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल, बुलढाणा येथे होणार असून सहभागी नागरिकांनी सकाळी ६.३० वाजेपर्यंत उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासन, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, शिक्षण विभाग, आयुष मंत्रालय, बुलढाणा जिल्हा योग संघटना, आरोग्य भारती, क्रीडा भारती, आर्ट ऑफ लिव्हिंग, पतंजली योग समिती, नेहरू युवा केंद्र, विविध क्रीडा मंडळे, महिला मंडळे, आयुर्वेद व नर्सिंग महाविद्यालये तसेच योग क्षेत्रात कार्यरत विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.

यावेळी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, शासकीय व निमशासकीय कार्यालये, क्रीडा मंडळे, अधिकारी-कर्मचारी, खेळाडू, युवक-युवती आणि योगप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. तसेच स्थानिक स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या योग कार्यक्रमांचा अहवाल, छायाचित्रे, सहभागींची संख्या आणि कार्यक्रमाची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवून योग संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भक्ती आंब्रे यांनी केले.

00000

संबंधित पोस्ट

खरपुडी येथे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

जिल्हास्तरीय युवा महोत्सवात सहभागी होण्यासाठीआज अंतिम मुदत इच्छुकांना अर्ज सादर करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

मिशन लक्ष्यवेध योजनेंतर्गत खेळाडूंनी निवड चाचणीसाठी 9 एप्रिलपर्यंत अर्ज करावेत- जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर- रोइंग, लॉन टेनिस, मैदानी, बॅडमिंटन, वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारातील प्रत्येकी 20 खेळाडूंची निवड होणार

vishwatmaklokswamivarta

वर्ल्ड स्कूल व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी मुंबई विभागीय निवड चाचणी १३ ऑगस्ट रोजी..

मिशन लक्षवेध अंतर्गत ॲथलेटिक्स क्रीडा प्रकारातील खेळाडू निवड चाचणीचे आयोजन

क्रीडा व व्यक्तिमत्व विकास शिबिरातून घडतील उत्कृष्ट खेळाडू-कारागृह अधीक्षक मेघा बाहेकर,बुलढाणा जिल्हा क्रीडा संकुलात उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचा प्रारंभ