vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

उपतालुकाप्रमुख अर्जुन पाटील -ठोंबरे यांच्या संघर्षाला यश;स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच जाफराबाद–छत्रपती संभाजीनगर एसटी सुरू-माहोरा – बरंजळा साबळे – नळणी – जवखेडा ठोंबरे – केदारखेडा – राजूर –तळेगाव – फुलंब्री मार्गावरील हजारो नागरिकांना दिलासा; जवखेडा ठोंबरे नगरीत येथे चालक-वाहकांचा जाहीर सत्कार

उपतालुकाप्रमुख अर्जुन पाटील -ठोंबरे यांच्या संघर्षाला यश;स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच जाफराबाद–छत्रपती संभाजीनगर एसटी सुरू-माहोरा – बरंजळा साबळे – नळणी – जवखेडा ठोंबरे – केदारखेडा – राजूर –तळेगाव – फुलंब्री मार्गावरील हजारो नागरिकांना दिलासा; जवखेडा ठोंबरे नगरीत येथे चालक-वाहकांचा जाहीर सत्कार

भोकरदन, (प्रतिनिधी)-ग्रामीण भागाच्या विकासासाठी आणि जनतेच्यामूलभूत वाहतूक सुविधेसाठी केलेल्या सातत्यपूर्ण संघर्षाला अखेर यश मिळालेआहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे भोकरदन उपतालुकाप्रमुख अर्जुन पाटील-ठोंबरे यांच्या अथक पाठपुराव्यामुळे स्वातंत्र्यानंतरप्रथमच जाफराबाद–छत्रपती संभाजीनगर दरम्यान माहोरा – बरंजळा साबळे–नळणी –जवखेडा ठोंबरे – केदारखेडा – राजूर – दाभाडी तळेगाव – फुलंब्री या मार्गे,नियमित एसटी बससेवा सुरू झाली आहे. अनेक दशकांपासून सार्वजनिक बससेवेपासून वंचित असलेल्या या परिसरासाठी हा ऐतिहासिक आणि अभिमानास्पद क्षण मानला जात आहे.माहोरा, वरूड, पिंपळगाव कड, बरंजळा साबळे, नळणी, जवखेडा ठोंबरे,केदारखेडा, राजूर,दाभाडी- तळेगाव, फुलंब्री तसेच परिसरातील हजारो नागरिकअनेक वर्षांपासून या बससेवेची प्रतीक्षा करत होते. शिक्षण, आरोग्य,रोजगार, शासकीय कामकाज, व्यापार आणि दैनंदिन प्रवासासाठी नागरिकांनामोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः विद्यार्थी,महिला,ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, कामगार आणि रुग्णांना या समस्येचासर्वाधिक फटका बसत होता. या प्रश्नाची तीव्रता ओळखून अर्जुन पाटील ठोंबरेयांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विभागीयकार्यालयापासून ते मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयापर्यंत सातत्यानेपाठपुरावा केला. अनेक निवेदने, स्मरणपत्रे, अधिकार्‍यांच्याभेटी,लोकप्रतिनिधींचे सहकार्य,ग्रामसभांचे एकमताने मंजूर ठराव, रस्तापाहणीची मागणी,पुनर्पाहणी,अंतिम रस्ता सर्वेक्षण, सकारात्मक रस्ता पाहणीअहवाल,विभागीय प्रस्ताव आणि वरिष्ठ पातळीवरील पाठपुरावा अशा सर्वप्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करूनही बससेवा सुरू होत नसल्याने त्यांनी हाप्रश्न सातत्याने लावून धरला. आवश्यक असल्यास लोकशाही मार्गाने जनआंदोलन तसेच न्यायालयीन लढ्याचा इशाराही देण्यात आला होता. अखेर प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेत ही बहुप्रतिक्षित बससेवा सुरू केली.या बससेवेमुळे ग्रामीण भाग थेट झपाट्याने विकसित होत असलेल्या छत्रपतीसंभाजीनगर शहराशी जोडला गेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, रुग्णांना उपचारासाठी,शेतकर्‍यांना बाजारपेठेसाठी, नोकरदारांनारोजगारासाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांना दैनंदिन प्रवासासाठी मोठादिलासा मिळणार आहे. ही बससेवा केवळ वाहतुकीची सुविधा नसून संपूर्ण परिसराच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासाला चालना देणारा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. बससेवा सुरू झाल्यानंतर जवखेडा ठोंबरे येथे चालक श्री एस. एस. हिवाळे व वाहक श्री सतीश बदर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. या ऐतिहासिक प्रसंगी गावकर्‍यांनी जल्लोष करत बसचे स्वागत केले.या कार्यक्रमास सरपंच लक्ष्मण ठोंबरे,श्रीनिवास काबरा,शेषरावठोंबरे,विलास मेथे, परमेश्वर ठोंबरे, अ‍ॅड. ललित ठोंबरे,बालाप्रसादठोंबरे, साहेबराव ठोंबरे, भीमराव घोडे, रावसाहेब डकले, राजू ठोंबरे, गणेशठोंबरे, तुषार चौधरी, महेश कोलते, ज्ञानेश्वर ठोंबरे, बाबुराव ठोंबरे,अण्णा ठोंबरे, मोहन वाघ, नामदेव काळे, नंदू मोरे, रमेश मोरे, सादिक पठाण,शिवाजी साठे यांच्यासह गावातील सर्व नागरिक, युवक, महिला, ज्येष्ठनागरिक, विद्यार्थी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळीउपस्थित नागरिकांनी बससेवा नियमित सुरू ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली.अनेकांनी हा दिवस परिसराच्या इतिहासातील सुवर्णक्षण असल्याचे सांगत आनंद व्यक्त केला.याबाबत प्रतिक्रिया देताना अर्जुन पाटील ठोंबरे म्हणाले, ‘ही केवळ एसटी बस सुरू झाल्याची घटना नाही, तर अनेक वर्षांपासून वाहतुकीच्या मूलभूतसुविधेपासून वंचित असलेल्या ग्रामीण जनतेच्या संघर्षाचा विजय आहे.स्वातंत्र्यानंतर प्रथमच आपल्या भागाला जाफराबाद मार्गे छत्रपतीसंभाजीनगरची थेट एसटी सेवा मिळाली आहे. ही बससेवा आपल्या गावांच्याविकासाला, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला, युवकांच्या रोजगाराला,शेतकर्‍यांच्या प्रगतीला, रुग्णांच्या आरोग्यसेवेला आणि संपूर्णपरिसराच्या उज्ज्वल भविष्यासाठी मिळालेली नवी दिशा आहे. या लढ्यात साथदेणार्‍या सर्व ग्रामस्थांचे, ग्रामपंचायतींचे, लोकप्रतिनिधींचे,प्रसारमाध्यमांचे आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील सर्व अधिकारी-कर्मचार्‍यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. जनतेच्या प्रत्येकप्रश्नासाठी माझा संघर्ष भविष्यातही असाच अविरत सुरू राहील, असे ठोंबरेम्हणाले.

०००००००००

फोटो ओळी…..२-जाफराबाद–छत्रपती संभाजीनगर बससेवेचे चालक व वाहक यांचा जवखेडा ठोंबरेनगरीत ग्रामस्थांच्या वतीने अर्जुन पाटील- ठोंबरे यांच्या हस्ते जाहीरसत्कार करण्यात आला.

००००००

संबंधित पोस्ट

खारघर येथील हिंद दी चादर कार्यक्रमास देश-विदेशातून संत- महंत आणि भाविकांची उपस्थिती

मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

vishwatmaklokswamivarta

पाण्याचा प्रत्येक थेंब महत्वाचा असून त्यासाठी जलजागृती होणे आवश्यक- पोलीस अधीक्षक संदीप घुगे- जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याचा शुभारंभ…

कामकाजात सुलभता आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा – मंदार कुलकर्णी ‘शासकीय कामकाज प्रभावीपणे कसे करावे’ या विषयावर मार्गदर्शन

जिल्हा परिषद ठाणे येथे ‘सेवा हक्क दिन’ निमित्त शपथविधी कार्यक्रम उत्साहात“आपली सेवा, आमचे कर्तव्य” संकल्पाने पारदर्शक व वेळेत सेवा देण्याचा निर्धार

दिव्यांग सशक्तीकरणाचे काम करणाऱ्या संस्था,व्यक्तीचे पुरस्कारसाठीअर्ज सादर करावेत.