vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

विधानसभा प्रश्नोत्तरे-राज्यातील सर्व नर्सिंग महाविद्यालयांसाठी प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) लागू करणार- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

विधानसभा प्रश्नोत्तरे-राज्यातील सर्व नर्सिंग महाविद्यालयांसाठी प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) लागू करणार- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई, प्रतिनिधी : राज्यातील सर्व नर्सिंग महाविद्यालयांमध्ये शिस्त, नियमितता आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) लागू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत दिली

गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयांतर्गत शासकीय परिचर्या प्रशिक्षण विद्यालयातील ४५ विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याच्या घटनेसंदर्भात सदस्य प्रवीण दटके यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री आबिटकर बोलत होते.

मंत्री आबिटकर म्हणाले की, या घटनेनंतर जिल्हा शल्यचिकित्सक, केटीएस सामान्य रुग्णालय, गोंदिया यांनी गठित केलेल्या त्रिस्तरीय चौकशी समिती तसेच अन्न व औषध प्रशासन, गोंदिया यांच्या अहवालानुसार विद्यार्थिनींना देण्यात आलेल्या अन्नामुळे विषबाधा झाल्याचे आढळून आलेले नाही.

गोंदिया येथील परिचर्या प्रशिक्षण विद्यालयातील वसतिगृहात विद्यार्थिनींना दिल्या जाणाऱ्या अन्नाची व पिण्याच्या पाण्याची नियमित तपासणी केली जात असून, विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेबाबत आवश्यक ती दक्षता घेतली जात आहे. राज्यातील सर्व नर्सिंग महाविद्यालयांमध्ये अशा घटना टाळण्यासाठी आणि व्यवस्थापनात एकसमानता आणण्यासाठी प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) लागू करण्यात येणार असल्याचेही मंत्री आबिटकर यांनी यावेळी सांगितले

संबंधित पोस्ट

आपत्कालीन स्थितीबाबत सर्वंकष आढावा-रक्तदात्यांनी पुढे यावे-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे आवाहन

पैठण-संत एकनाथ महाराज  नाथषष्ठी यात्रोत्सवानिमित्त वाहतूक मार्गात बदल…

मुंबई भारताची ‘कन्व्हेन्शन कॅपिटल’- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ताज समुहाच्या नव्या ताज बॅण्डस्टॅण्ड हॉटेलचे भूमिपूजन..

vishwatmaklokswamivarta

भारतीय रेल्वे लवकरच आपली पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करणार

vishwatmaklokswamivarta

बेवारस दुचाकी वाहनांच्या मालकी हक्काचा पुरावा सादर करुन**वाहने घेऊन जाण्यासाठी पोलीस विभागाचा जाहीरनामा*

vishwatmaklokswamivarta

आपत्ती निवारणासाठी प्रशासन अलर्ट; पूरप्रवण भागांसाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करण्याचे पालकमंत्री संजय राठोड यांचे निर्देश दारव्ह्यातील दहेली येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांची तातडीची बैठक, आपत्ती व्यवस्थापन उपाययोजनांचा घेतला आढावा