vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महिला स्वयंसहायता गटांमुळे देशात क्रांती – राज्यपाल जिष्णु देव वर्मा १०० सर्वाधिक प्रभावशाली महिलांचा सन्मान; नीता अंबानी, स्मृती इराणी, झिया मोदी, नीरजा बिर्ला यांची उपस्थिती

महिला स्वयंसहायता गटांमुळे देशात क्रांती – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

१०० सर्वाधिक प्रभावशाली महिलांचा सन्मान; नीता अंबानी, स्मृती इराणी, झिया मोदी, नीरजा बिर्ला यांची उपस्थिती

मुंबई प्रतिनिधी  : महिला स्वयंसहायता गटांमुळे देशातील महिलांच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय सक्षमीकरणाला गती लाभली असून ग्रामीण – आदिवासी महिलांच्या जीवनात क्रांतिकारक बदल झाले आहेत. गावोगावींच्या महिलांमध्ये नेतृत्वगुण विकसित होत आहेत. हे कार्य अधिक जोमाने होण्यासाठी समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी  केले.

फॉर्च्युन इंडिया’ मासिकातर्फे देण्यात येणाऱ्या ‘फॉर्च्युन इंडिया १०० मोस्ट पॉवरफुल वुमेन (सर्वाधिक प्रभावी महिला)’ पुरस्काराचा आरंभ राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत १० जुलै रोजी मुंबई येथे झाला, त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते ‘फॉर्च्युन इंडिया’ मासिकाच्या नव्या अंकाचे प्रकाशन करण्यात आले.

विविध क्षेत्रात नेतृत्वस्थानी असलेल्या महिलांना संबोधित करताना, राज्यपाल म्हणाले की, महिला स्वयंसहायता गटांमुळे स्वतःच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून इतरांना देखील प्रोत्साहन देणाऱ्या महिला अनेक ठिकाणी उदयास आल्या आहेत.

 

पूर्वी बँकेत जाण्यासदेखील घाबरणाऱ्या त्रिपुरा येथील एका ग्रामीण महिलेने कालांतराने स्वतः अधिकाऱ्यांसमोर आत्मविश्वासाने पॉवर पॉईंट सादरीकरण केले त्यावेळी सर्व उपस्थित आश्चर्यचकित झाले होते. ती महिला ‘बँक सखी’ म्हणून आज अनेक महिलांना मदत करीत असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांकडील अनुत्पादक मालमत्तेचे प्रमाण (एनपीए) १ टक्क्यापेक्षाही कमी आहे. महिलांकडे गेलेला पैसे सुरक्षित असतो, असे त्यांनी सांगितले.

 

देशातील ५० टक्के नागरिक महिला असल्यामुळे त्यांच्या विकासाकडे दुर्लक्ष करून ‘विकसित भारता’चे लक्ष्य साध्य करता येणार नाही. त्यामुळे समाजातील शेवटच्या स्तरावरील महिलेपर्यंत पोहोचून तिचे सक्षमीकरण झाले पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले.महिला परिवर्तनाच्या अग्रस्थानी : अनुप्रिया पटेल

आज महिला तळागाळापासून ते उद्योग जगतातील मोठमोठ्या जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत आहेत. विकास प्रक्रियेत त्या केवळ सहभागी होत नसून परिवर्तनाच्या अग्रस्थानी आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी यावेळी केले. यावेळी त्यांनी उपस्थितांना केंद्र शासनाच्या महिला सक्षमीकरणाच्या कार्याची माहिती दिली. मातेचे आरोग्य सुधारण्यासाठी तसेच माता मृत्युदर कमी करण्यासाठी केंद्र शासनाच्या कार्याची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आल्याचे सांगून त्यांनी ‘नारीशक्ती वंदन’ अधिनियम व ‘पोषण अभियान’ उपक्रमाची माहिती दिली.

गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून महिलांचे रक्षण करण्यासाठी केंद्र शासनातर्फे एचपीव्ही लस देण्यात येत असल्याचे सांगून त्यांनी ‘आयुष्मान भारत’ योजना, ‘जनऔषधी औषधालये, लखपती दीदी, नमो ड्रोन आदी योजनांची माहिती दिली.सुरुवातीला राज्यपालांच्या हस्ते ‘फॉर्च्युन इंडिया’ मासिकाच्या अंकाचे प्रकाशन करण्यात आले. आरपी संजीव गोयंका समूहाचे उपाध्यक्ष शाश्वत गोयंका यांनी प्रास्ताविक केले तर ‘फॉर्च्युन इंडिया’चे मुख्य संपादक सौरव मुजुमदार यांनी आभारप्रदर्शन केले

उदघाटन सत्राला नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार चौहान, रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी, माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, कॉर्पोरेट लॉ फर्म एझेडबी अँड पार्टनर्सच्या सह संस्थापिका झिया मोदी, नीरजा बिर्ला यांसह उद्योग, व्यवसाय, बँकिंग क्षेत्रातील प्रभावी महिला उपस्थित होत्या.

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई #मेट्रो लाईन २ ब (डी.एन. नगर ते मंडाले) चा पहिला टप्पा देशभक्त एन.जी. आचार्य उद्यान – डायमंड गार्डन ते मंडाले या मार्गाचे लोकार्पण तसेच पॉड टॅक्सी प्रकल्पाचे ई भूमीपूजन करण्यात आले.

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र युवा जलदूत’ देणार जलसंधारणाचा संदेश

पुण्यातील मानाच्या पहिल्या गणपतीचं विसर्जन, दगडूशेठची मिरवणूक सुरु, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष) ग्रामीण भारताचा चेहरामोहरा बदलणारा,नागरिककेंद्रीत गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले पंतप्रधान मोदींचे अभिनंदन

vishwatmaklokswamivarta

छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणक्षेत्रात अनधिकृत भूखंड, बांधकामाचे होणार सर्वेक्षण- महानगर आयुक्त तथा विभागीय आयुक्त दिलीप गावडेØ शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मदतीने करणार सर्वेक्षणØ विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याचे महानगर आयुक्त तथा विभागीय आयुक्तांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

आरावी व श्रीवर्धन बीच विकासकामांचा-महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta