vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

सेंट्रल बँक ऑफ इंडिया तर्फे 21 ऑगस्ट रोजी अमरावती येथे‘विविध कर्ज वितरण शिबीरा’चे आयोजन

सेंट्रल बँक ऑफ इंडिया तर्फे 21 ऑगस्ट रोजी अमरावती येथे‘विविध कर्ज वितरण शिबीरा’चे आयोजन

 अमरावती, प्रतिनिधी: सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वतीने 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7.00 वाजता गाडगे बाबा महाराज हॉल, गाडगे नगर येथे विविध किरकोळ कर्ज योजनांची माहिती देण्यासाठी ‘ विविध कर्ज वितरण शिबीरा’चे आयोजन करण्यात आले आहे.

    या शिबीरामध्ये नागरिकांना सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या विविध किरकोळ कर्ज योजनांची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. यामध्ये गृह कर्ज, वाहन कर्ज, गोल्ड लोन, पर्सनल लोन तसेच मॉर्टगेज लोन यांचा समावेश आहे. ग्राहकांना बँकेच्या विविध कर्ज योजनांच्या अटी, पात्रता, आवश्यक कागदपत्रे तसेच उपलब्ध व्याजदर याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे

     या कार्यक्रमास सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे वरिष्ठ क्षेत्रीय प्रबंधक सुनील पाण्डेय यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून, विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी मोठ्या संख्येने या शिबिराला उपस्थित राहून बँकेच्या विविध कर्ज योजनांची माहिती घेऊन त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अग्रणी जिल्हा व्यवस्थापक नरेश हेडाऊ यांनी केले आहे.

 

00000000

संबंधित पोस्ट

मोताळा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिल्पनिदेशक पदाची भरती

vishwatmaklokswamivarta

इस्त्राईल देशात होम बेस्ड हेल्थ केअर गिव्हर वर्कर्स पदासाठी संधी..

vishwatmaklokswamivarta

वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रथम सत्रासाठी प्रवेश अर्ज सादर करण्याची 10 जून मुदत..

Gadchiroli 🌍: इस्त्राईलमध्ये रोजगाराची सुवर्णसंधी ✨कौशल्य विकास केंद्राचे तरुणांना आवाहन 🙌

शून्यातून विश्व निर्माण करणारी ‘केक क्वीन’: सातारच्या स्मिता बेंद्रे*

उद्योग संरेखित आणि नवयुगीन अल्पकालीन व्यवसाय अभ्यासक्रमाचा शुभारंभ संपन्न

vishwatmaklokswamivarta