vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राज ठाकरे  यांच्या मनसेने हिंदुत्वाचा नारा दिला आहे. मनसेने शिवसेना भवना समोरच ‘गर्व से कहो हम हिंदू है’ चा बॅनर लावला

राज ठाकरे  यांच्या मनसेने हिंदुत्वाचा नारा दिला आहे. मनसेने शिवसेना भवना समोरच ‘गर्व से कहो हम हिंदू है’ चा बॅनर लावला

मुंबई प्रतिनिधी शिवसेनेची दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरु आहे. तर दुसरीकडे मुंबईत दसऱ्याच्या शुभेच्छा देताना राज ठाकरे  यांच्या मनसेने हिंदुत्वाचा नारा दिला आहे. मनसेने शिवसेना भवना समोरच ‘गर्व से कहो हम हिंदू है’ चा बॅनर लावला आहे. याखेरीज मुंबईत काही ठिकाणी असे पोस्टर्स लावण्यात आलेत. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न मनसेने केला आहे.

शिवसेनेची स्थापना झाली ती मुळात हिंदुत्वाचा नारा देत आणि मराठी माणसाठी शिवसेना. आता शिवसेनेचा हा मुद्दा मनसेने हायजॅक करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गडात अर्थात दादरमध्ये तेही शिवसेना भवनासमोर बॅनर झळकवले आहे. त्यामुळे आता शिवसेना बॅनरच्या माध्यमातून उत्तर देणार की थेट दसरा मेळाव्यात खडेबोल सुनावणार याची उत्सुकता आहे. आता या बॅनरवरुन राजकारण तापणार हे स्पष्ट होत आहे. आगामी पालिका निवडणुकीत हा मुद्दा पुढे येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मुंबईत आज शिवसेनेचा दसार मेळावा होत आहे. या मेळाव्याची शिवसेनेकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. या दसरा मेळाव्याला हजारो शिवसैनिक उपस्थित राहू शकणार आहेत. बंदीस्त सभागृहातील उपस्थिती मर्यादा शिथिल करण्यात आली आहे. षण्मुखानंद सभागृहाच्या पूर्ण क्षमतेने प्रवेशाची शक्यता आहे. षण्मुखानंद सभागृहाची आसन क्षमता 3 हजार आहे. त्यामुळे या मेळाव्यात शिवसेनेचा जोश दिसणार हेच दिसून येत आहे.

आजच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला षण्मुखानंद सभागृहाच्या पूर्ण क्षमतेने शिवसैनिकांना प्रवेश दिला जाऊ शकतो. कारण 8 ऑक्टोबर रोजी राज्य सरकारने बंदिस्त सभागृहात 200 पेक्षा जास्त लोकांना प्रवेश देता येणार नाही, ही मर्यादा काढून टाकली आहे

संबंधित पोस्ट

श्री क्षेत्र अरण तीर्थक्षेत्राला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्री क्षेत्र अरण तीर्थक्षेत्र विकासासाठी आवश्यक तेवढा निधी देणार

अनाथ बालकांच्या पालकत्वासाठी समाजाने पुढे यावे-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

ढाका येथे झालेल्या महिला कबड्डी विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाने विश्वविजेतेपद पटकावल्याबद्दल उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी संघाचे अभिनंदन

vishwatmaklokswamivarta

अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून विभागाच्या कामाचा आढावा

अवयवदान चळवळ म्हणून राबवा – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश दि. ३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राज्यात ‘अवयवदान पंधरवडा’ 

vishwatmaklokswamivarta

सातारा जिल्ह्याच्या उद्योगवाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्नशील- उद्योग मंत्री उदय सामंत,महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्रादेशिक कार्यालय साताराचे लोकार्पण,एक्सपोर्ट पारितोषीक वितरण समारंभ साताऱ्यात होणार,उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी विभागस्तरावर जनता दरबार भरविणार