vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

सेवा संकल्प अभियानातून घरकुलांना गती; सांगलीत १२,०८५ घरकुले पूर्ण- प्रत्येक घरकुल लाभार्थ्याशी संवाद साधण्यावर भर;- क्षेत्रीय यंत्रणांना “सेवा हाच सर्वोच्च संकल्प”चा संदेश

सेवा संकल्प अभियानातून घरकुलांना गती; सांगलीत १२,०८५ घरकुले पूर्ण- प्रत्येक घरकुल लाभार्थ्याशी संवाद साधण्यावर भर;- क्षेत्रीय यंत्रणांना “सेवा हाच सर्वोच्च संकल्प”चा संदेश

        सांगली, प्रतिनिधी: सांगली जिल्हा परिषदेकडून प्रधानमंत्री आवास योजना–ग्रामीणमधील घरकुलांच्या पूर्ततेसाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात मंजूर ४१,५६४ घरकुलांपैकी १२,०८५ घरकुले पूर्ण झाली असून, उर्वरित घरकुलांचे काम नियोजनबद्ध पद्धतीने पुढे नेले जात आहे. सेवा संकल्प अभियानातून प्रत्येक घरकुल लाभार्थ्याशी थेट संवाद साधत घरकुल कामाचा आणि प्रगतीचा आढावा घेण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच, क्षेत्रीय यंत्रणांना “सेवा हाच सर्वोच्च संकल्प” याच भावनेतून कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी दिल्या आहेत.

   “सेवा हाच सर्वोच्च संकल्प” हाच संदेश देत क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत वेळेवर मार्गदर्शन आणि शासनाच्या योजनांचा लाभ पोहोचवणे, ही प्रशासनातील प्रत्येक क्षेत्रीय कर्मचाऱ्याची महत्त्वाची जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.       राज्य शासनाने ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत राज्यात १५ लाख घरकुले पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी जिल्हा व तालुकास्तरावरील घरकुल आणि मनरेगा विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत नियमित आढावा बैठका घेतल्या जात आहेत. लाभार्थ्यांना प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन आणि संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय साधण्यावर भर देण्यात येत आहे.       याचबरोबर मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नरवाडे यांनी बेडग आणि आरग येथे प्रत्यक्ष भेट देऊन घरकुलांच्या कामांची पाहणी केली. तर अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांनी वाळवा तालुक्यातील कामांचा आढावा घेतला. या क्षेत्रीय भेटींमधून लाभार्थ्यांशी संवाद, स्थानिक यंत्रणांना मार्गदर्शन आणि कामांचा प्रत्यक्ष पाठपुरावा केला जात आहे.

        सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक पात्र कुटुंबाला पक्के घर मिळवून देण्याच्या उद्दिष्टाला गती मिळत आहे. प्रशासन, क्षेत्रीय यंत्रणा आणि लाभार्थी यांच्या समन्वित प्रयत्नांतून सांगली जिल्ह्यात घरकुल पूर्ततेची मोहीम पुढे सुरू आहे.

00000

संबंधित पोस्ट

विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र ऑनलाइन सादर करावेॲपद्वारे प्रक्रिया सुलभ ; अनुदान बंद होऊ नये म्हणून प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र शासनाचे ५, १३ आणि २३ वर्षे मुदतीचे अनुक्रमे ८०० कोटी, १६०० कोटी व १२०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

साप दिसला की मारू नका!’ भरणे येथील नवभारत हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे विद्यार्थ्यांना सर्पसंवर्धनाचा संदेश..

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन

महानगरासह ग्रामीण भागाच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्यक्रम – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपुरच्या कस्तुरचंद पार्कवर प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय समारंभ उत्साहात

vishwatmaklokswamivarta

दिव्यांगांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे