
आज लाखो विद्यार्थी म्हाडाची परीक्षा देण्यासाठी शेकडो , परीक्षा ठिकाणी एसटी, रेल्वेने पोहोचले. हजारो विद्यार्थी एसटी स्टॅन्डवर, रेल्वे स्थानकावर झोपले. पण पहाटे परीक्षा रद्द…
म्हाडाच्या विविध पदांसाठी आज परीक्षा होणार होती. मात्र, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मध्यरात्री एक व्हिडिओ जारी करत परीक्षा रद्द झाल्याची घोषणा केली. त्यानंतर विद्यार्थी संतप्त झाले असून भाजपकडूनही राज्य सरकारवर टीका करण्यात आली आहे.
”आज लाखो विद्यार्थी म्हाडाची परीक्षा देण्यासाठी शेकडो किलोमीटर लांब असणाऱ्या परीक्षा ठिकाणी एसटी, रेल्वेने पोहोचले. हजारो विद्यार्थी एसटी स्टॅन्डवर, रेल्वे स्थानकावर झोपले. पण पहाटे परीक्षा रद्द करण्याची घोषणा मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली. आज मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी चे अध्यक्ष माननीय पवार साहेबांना अनोख्या शुभेच्छा दिल्या वाटतं”, अशी टीका भाजप आमदार राम सातपुते यांनी केली. तसेच नालायक, निष्क्रिय आणि वाचाळ महाभकास आघाडी असून त्यांचा निषेध नोंदवत असल्याचेही ते म्हणाले.नेमकं काय आहे प्रकरण? -आज म्हाडाच्या इंजिनिअरींग पदासाठी परीक्षा घेण्यात येणार होती. काही परीक्षा सकाळच्या सत्रात, काही परीक्षा दुपारच्या सत्रात होणार होत्या. मात्र, जितेंद्र आव्हाड यांनी मध्यरात्री २ वाजता ट्विटरवर एक व्हिडिओ जारी करत या परीक्षा जानेवारीत घेण्यात येणार असल्याची घोषणा केली. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांची माफी देखील मागितली. त्यानंतर आम्ही शेकडो किलमीटरवरून परीक्षा केंद्रावर आलो असून आमचा खर्च कोण भरून देईल? असा सवाल करत विद्यार्थ्यांनी आव्हाडांवर संताप व्यक्त केला. त्यानंतर हा पेपर फोडण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.



