vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

महाराष्ट्र राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले

महाराष्ट्र राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले ….

मुंबई प्रतिनिधी

राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु असून अध्यक्षपदाची निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. याआधी नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर अद्याप अध्यक्षाची निवड झालेली नाही. ती यावेळी आवाजी मतदानाने घेण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या हालचाली सुरु आहेत. दरम्यान, यावरून आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते असं विधान केलं आहे.

 

महाविकास आघाडीचे नेते राज्यपालांकडे अध्यक्षपदाच्या निवडीबाबत चर्चेसाठी गेले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यपालांच्या अधिकारबद्दल मी बोलणं बरोबर होणार नाही. राज्यपालांना उलटसुलट बोलण्याचा अधिकार महाविकास आघाडीच्या नेत्यांना असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.चंद्रकांत पाटील म्हणाले की, आता तुम्ही नियमात बदल करून त्यांच्याकडे तारीख मागताय, दोन वेळा तुम्हाला तारीख दिली पण निवडणूक घेतली नाही. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक न घेणं हा घटना राज्यपालांचा म्हणजे पर्यायाने घटनेचा अवमान असतो. या एका मुद्द्यावर सुद्धा राष्ट्रपती राजवट येऊ शकते असं त्यांनी म्हटलं.

चंद्रकांत पाटील यांनी याआधीही राज्यात राष्ट्रपती राजवटीबद्दल विधान केलं होतं. त्यामुळे बरीच चर्चाही झाली होती. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्याआधी काही काळ राष्ट्रपती राजवट लागू होती

संबंधित पोस्ट

बाळासाहेबांची शिवसेना आणि शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्याविरोधात एसआयटी चौकशी करण्याचे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले आहे

vishwatmaklokswamivarta

काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांची निवड २० सप्टेंबपर्यंत ; प्रक्रिया सुरू, कार्य समिती अंतिम तारीख ठरवणार२० सप्टेंबपर्यंत ही निवडप्रक्रिया कुठल्याही स्थितीत पूर्ण करणार, असा निर्धार पक्षाच्या निवडणूक यंत्रणेने व्यक्त केला

मराठी माणसाला डिवचू नका! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा राज्यपाल भगत सिंग कोश्यारींवर हल्लाबोल

कसबा, चिंचवड विधानसभा पोटनिवडणूका होणार आणि महाविकास आघाडी जिंकणार; संजय राऊत… खासदार

vishwatmaklokswamivarta

रॉबर्ट वाड्रांवर अटकेची टांगती तलवार? लंडनमधील 18 कोटींच्या संपत्तीसंदर्भात ED थेट कोर्टात…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे युतीसाठी करतील प्रचार

vishwatmaklokswamivarta