
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन खात्यातर्फे दर शनिवार आणि रविवारी मा.उपायुक्त घन कचरा व्यवस्थापन यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष स्वच्छता व जनजागृती अभियान संपूर्ण मुंबईच्या 24 विभागात सुरू
**सूर म्हणतो साथ दे,दिवा म्हणतो वात दे!**
**स्वच्छ मुंबई साठी मुंबईकर नागरिका,मुंबई महानगरपालिकेस फक्त तुझी साथ दे**
मुंबई प्रतिनिधी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन खात्यातर्फे दर शनिवार आणि रविवारी मा.उपायुक्त घन कचरा व्यवस्थापन यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष स्वच्छता व जनजागृती अभियान संपूर्ण मुंबईच्या 24 विभागात सुरू असून,स्वच्छते सोबत मुंबईकरांचे स्वच्छतेबाबत दायित्व व सहभाग घेतला जात आहे.
रविवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी जी.उत्तर विभागात याचा इफेक्ट दिसून आला असून सहाय्यक अभियंता श्री.सय्यद काझी यांच्या मार्गदर्शनामध्ये मनपा कर्मचारी,माहीम चे ALM पदाधिकारी,सामाजीक संस्था,दरगाह कमिटीचे पदाधिकारी, मदाराश्यातील विद्यार्थी तसेच संगम प्रतिष्ठाण या सुका कचरा वर्गीकरण आणि व्यवस्थापनावर मनपा सोबत कार्यरत संस्थेच्या पदाधिकारी यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन स्वच्छता आणि वर्गीकरण या विषयावर प्रभात फेरीच्या माध्यमातून सकाळी 9 ते 12 या वेळेत स्थानिक राहिवाश्यांच्या माध्यमातून जनजागृती केली.
यावेळी नागरिक आणि व्यापारी वर्गाकडून या अभियानाचे स्वागत करण्यात आले,व यापुढे **माझा कचरा माझी जबाबदारी** ही चळवळ यशस्वी करण्याची हमी दिली आहे.



