vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महाराष्ट्रात एसटी विलिनीकरण : त्रिसदस्यीय समितीच्या अहवालाबाबत मोठी बातमी

: महाराष्ट्रात एसटी विलिनीकरण : त्रिसदस्यीय समितीच्या अहवालाबाबत मोठी बातमी

[ मुंबई प्रतिनिधी: एसटी विलिनीकरणाबाबत (ST Merger) त्रिसदस्यीय समितीने दिलेला अहवाल जाहीर करता येणार नाही, अशी माहिती राज्य सरकारच्यावतीने आज मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली.

राज्य मंत्रिमंडळाच्या मंजुरीशिवाय अहवाल सार्वजनिक करता येणार नाही, असा दावा सरकारी वकील अॅड. काकडे यांनी केला आहे. ST महामंडळाला देखील अहवाल दिलेला नाही. तसेच संपकरी कर्मचाऱ्यांच्या वकिलांनाही अहवाल दिलेला नाही, असे राज्य सरकारच्यावतीने न्यायालयात न्यालयात सांगण्यात आले. न्यायालयाचा आदेश असूनही संपकरी कर्मचारी अजून कामावर रूजू झालेले नाहीत, असेही यावेळी सांगण्यात आले.

एसटी महामंडळाचं (Msrtc Strike) राज्य सरकारमध्ये (Maharashtra Government) विलिनीकरणच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी हे गेल्या तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून संपावर आहेत. महामंडळाने कर्मचाऱ्यांचे सेवाज्येष्ठतेनुसार वेतन वाढवून दिले. मात्र त्यानंतरही कर्मचारी हे विलीनीकरणाच्या भूमिकेवर ठाम आहेत.

दरम्यान, सध्यातरी एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण शक्य नसल्याचं, सूत्रांनी त्रिसदस्यीय अहवालातील माहितीनुसार म्हटले आहे. त्याचवेळी त्रिसदस्यीय समितीचा अहवाल जाहीर करता येणार नाही, असे म्हटले आहे.

 

मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला त्रिसदस्यीय समितीचा अहवाल सादर करण्यासाठी 12 आठवड्यांच्या मुदतीनंतर आणखी 7 दिवसांची मुदत वाढवून दिली. त्यानुसार आज या अहवालाबाबत मोठी माहिती पुढे आली आहे.

संबंधित पोस्ट

कोकण, पश्चिम महाराष्ट्र ते मराठवाड्यातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता, IMD कडून यलो ॲलर्ट जारी

vishwatmaklokswamivarta

रायगड जिल्ह्यातील खालापूर येथे असलेल्या इर्शाळवाडी येथे घडलेल्या दुर्घटनाग्रस्तांना नुकसानभरपाई म्हणून मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत तर जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येणार

सोलापूर येथील एसटीच्या स्टेअरिंगचा रॉड तुटला, चालकाचं नियंत्रण सुटलं, सुदैवाने मोठा अनर्थ टळला, 70-75 प्रवासी बचावले..

नशामुक्त भारत अभियान अंतर्गत 12 ऑगस्ट रोजी सामूहिक प्रतिज्ञा घेण्याच्या आवाहन 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट.

नाशिकमध्ये हनुमान जन्मस्थळाचा वाद पेटला.  साधू, महंत यांच्यातच राडा, धर्मसभा बनली आखाडा