
अनिल देशमुख यांचं टेन्शन वाढले, सीबीआयचे अधिकारी जबाब नोंदवणार…
मुंबई: प्रतिनिधी: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं पुन्हा एकदा टेन्शन वाढलं आहे. अनिल देशमुख यांचा सीबीआयकडून आज पुन्हा जबाब नोंदवला जाणार आहे. त्यासाठी सीबीआयची टीम आज आर्थर रोड कारागृहात पोहोचली आहे. देशमुख यांचे वकील इंदरपाल सिंगही आर्थर रोड तुरुंगात पोहोचले आहेत. 100 कोटींच्या वसुली प्रकरणी अनिल देशमुख यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. कालही सीबीआयने देशमुख यांचा जबाब नोंदवला होता. उद्याही देशमुख यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. देशमुख यांचा जबाब सलग नोंदवला जात आहे. मात्र, सीबीआयकडून देशमुखांवर प्रश्नांची काय सरबत्ती करण्यात आली हे गुलदस्त्यात आहे. काल काही प्रश्नांची उत्तरे अनिर्णित राहिल्याने सीबीआयकडून देशमुख यांना आजही तेच प्रश्न विचारले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सीबीआयची एक टीम आर्थर रोड तुरुंगात पोहोचली आहे. ही टीम अनिल देशमुख यांचा कबुली जबाब नोंदवणार आहे. किती तास ही प्रक्रिया चालेल याबाबत काहीही सांगण्यात आलेलं नाही. यावेळी देशमुख यांचे वकील इंदरपाल सिंगही उपस्थित राहणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. इंदरपाल सिंग हे सुद्धा आर्थर रोड तुरुंगात पोहोचले आहेत.



