vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राज्यात: अधिवेशनाचा आज दुसरा दिवस; ओबीसी आरक्षणावरून भाजप आक्रमक

राज्यात: अधिवेशनाचा आज दुसरा दिवस; ओबीसी आरक्षणावरून भाजप आक्रमक

[ मुंबई प्रतिनिधी: अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवसही चांगलाच वादळी ठरण्याची चिन्ह आहेत. ओबीसी आरक्षणावरून विधीमंडलात भाजप आक्रमक होणार असून, रात्री उशिरा देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्यावर झालेल्या भाजप आमदारांच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडी ओबीसी आरक्षण विरोधात असल्याचा आरोप विरोधकांचा आहे.

विधीमंडळ कामकाज सुरू होण्याआधी महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक होणारा आहे. विधानभवनात थोड्याच वेळात प्रमुख नेत्यांची बैठक आहे. विरोधकांना प्रत्युत्तर देण्याबाबत बैठकीत चर्चेची शक्यता आहे. नवाब मलिकांचा राजीनाम्यासाठी भाजप आग्रही आहे. तर ओबीसी आरक्षण रद्द मुद्दाही विधानसभेत गाजणार आहे. त्यामुळे रणनीती ठरवण्यासाठी अजित पवार, अशोक चव्हाण, सुभाष देसाईंसह मविआचे प्रमुख नेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिलाय. ओबीसी आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सुप्रीम कोर्टाने नाकारलाय. राजकीय प्रतिनिधित्वाची योग्य आकडेवारी रिपोर्टमध्ये नसल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटलं.

 

त्यामुळे मुदत उलटलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याचे निर्देशही कोर्टानं दिले.

संबंधित पोस्ट

उद्योगपती साइरस मिस्त्री यांचे रस्ते अपघातात निधन, मुंबई अहमदाबाद मार्गावर चारोटी येथे मर्सिडीज रस्तादुभाजकाला धडकली

vishwatmaklokswamivarta

गणेशोत्सवासाठी राज्य शासनाची विशेष योजना

आपले सरकार सेवा केंद्रासाठी इच्छुक नागरिकांनी अर्ज सादर करावेत-जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे…

vishwatmaklokswamivarta

पर्यटन क्षेत्रातील उद्यमीला मुकलो केसरी टूर्सचे केसरीभाऊ पाटील यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली…

vishwatmaklokswamivarta

पवईमध्ये रिपब्लिकन पक्षाचा ईशान्य मुंबई जिल्ह्याचा मेळावा* *केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित राहणार

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील मतमोजणीची तालुकानिहाय ठिकाणे निश्चित

vishwatmaklokswamivarta