
*उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक प्रचार:आज मिरझापुर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांची सभा*
मुंबई प्रतिनिधी – उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाची साथ भाजप ला महत्वाची ठरत असून रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले मित्रपक्ष भाजप साठी स्टार प्रचारक ठरले आहेत. दलित बहुजनांचे हृदसम्राट नेते म्हणून रामदास आठवले लोकप्रिय आहेत.मात्र त्यांच्या भाषण शैलीतील अनोख्या शीघ्रकाव्य चारोळी सादर करण्याच्या त्यांच्या वक्तृत्व कौशल्याचे चाहते दलित बहुजनांसह सर्व समाज जाती आणि वर्गातील लोक आहेत. त्यामुळे प्रचार सभेत ना.रामदास आठवले यांचे भाषण ऐकण्यासाठी जनता मोठया संख्येने उपस्थित असते.आज मिरझापुर येथे भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आहे. या जाहीर सभेत ना.रामदास आठवले हे सुद्धा प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. संसदेत आपल्या काव्य शैलीचे गारुड पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चालविणारे रामदास आठवले यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आवडीने कविराज म्हणतात. आज मिरझापुर मध्ये पंतप्रधानांचे लाडके कविराज रामदास आठवले आज मिरझापुरच्या जनतेला आपल्या वक्तृत्वाची झलक दाखवतील.त्यामुळे मिरझापुर च्या जनतेला दुग्धशर्करा योग लाभला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांची जाहीर सभा म्हणजे मिरझापुर च्या जनतेसाठी दूध मे शक्कर चा योग आहे.
ना.रामदास आठवले हे दोन दिवस उत्तर प्रदेशात वाराणसी;आझमगढ आणि मिरझापुर या जिल्ह्यांत भाजप उमेदवारांचा प्रचार करीत असून दि.5 मार्च रोजी ना.रामदास आठवले हे राजस्थानमध्ये उदयपूर दौऱ्यावर



