vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

नागपूर येथील नाना पटोले यांचे वकील सतीश उके ईडीच्या ताब्यात…

 नागपूर येथील नाना पटोले यांचे वकील सतीश उके ईडीच्या ताब्यात…

नागपूर प्रतिनिधी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उके यांच्या घरावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)आज सकाळी छापेमारी सुरू केली होती. त्यानंतर त्यांना ईडीने आपल्या ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांचे भाऊ प्रदीप उके यांनाही ताब्यात घेतले. ईडीचे पथक सकाळीच सतीश उके यांच्या नागपुरातील घरी दाखल झाले होते.

सतीश उके यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक याचिका दाखल केली होती. त्यामुळे ते अधिक चर्चेत आले होते. नागपुरातील त्यांच्या घरावर ईडीचा छापाने टाकला होता. जो व्यक्ती मोदी यांच्या सरकार विरोधात भूमिका मांडेल त्यावर केंद्रीय यंत्रणा गैरवापर करत कारवाई करत आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी दिली आहे. वकील उके यांच्यावर केलेल्या ईडी कारवाईनंतर पटोले यांनी टीका केली आहे.

 

सतीश ऊके यांच्या घरी ईडीची छापेमारी सुरू असताना त्यांना भेटायला  वकील सहकारी वैभव जगताप आणि त्यांचे सहकारी गेले होते. उके यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई होत असल्याचा आरोप त्यांच्या वकील सहकाऱ्यांनी केला आहे.

संबंधित पोस्ट

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024-आठही विधानसभा मतदार संघात एकही उमेदवार अर्ज माघार नाही

vishwatmaklokswamivarta

हॉटेल्सचालक, अन्न व्यावसायिकांचे प्रशिक्षण ग्राहक देवतेचा ‘नैवेद्य’ भेसळमुक्त असावा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

12 तारखेला ठाण्यात सबा होणार करारा जबाब मिलेगा! राज ठाकरे यांच्या ठाण्यातील सभेपूर्वी मनसे आक्रमक

विकासकामांच्या माध्यमातून उपलब्ध सेवा-सुविधांचे नागरिकांनी संवर्धन करावे – मंत्री छगन भुजबळ

vishwatmaklokswamivarta

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ३७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्यात : हनुमान जयंतीनिमित्ताने सर्व राज्यांना अलर्ट राहण्याच्या केंद्राच्या सूचना…

vishwatmaklokswamivarta