vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

लाऊड स्पीकर कायदा महाराष्ट्रात अशाप्रकारे,: मुंबई मध्ये कायद्यानुसार Industrial area ते Silence Zone मध्ये कधी किती डेसिबल मध्ये लाऊडस्पीकर लावण्यास आहे परवानगी?

 लाऊडस्पीकर कायदा महाराष्ट्रात असा, मुंबई मध्ये कायद्यानुसार Industrial area ते Silence Zone मध्ये कधी किती डेसिबल मध्ये लाऊडस्पीकर लावण्यास आहे परवानगी?

 

मुंबई प्रतिनिधी:आजच गृहमंत्र्यालयाने दिलेल्या आदेशानुसार केवळ परवानगी असलेले लाऊडस्पीकरच वाजवले जाऊ शकतात. अनधिकृत लाऊडस्पीकरवरून काहीही वाजवल्यास त्यांना कारवाईला सामोरं जावं लागणार आहे.

महाराष्ट्रामध्ये सध्या ‘लाऊडस्पीकर’ वरून वाद पेटला आहे. गुढीपाडव्याच्या मनसेच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवा नाहीतर आम्ही दुप्पट आवाजात मशिदीसमोर हनुमान चालिसा लावू असा आदेश दिल्यानंतर सध्या राजकीय, प्रशासकीय स्तरावर हालचालींना वेग आला आहे. राज ठाकरेंचा दावा आहे की हा प्रश्न धार्मिक नसून सामाजिक आहे. सध्या रमजान महिना सुरू असल्याने रमजान ईद अर्थात 3 मे पर्यंत त्यांनी राज्य सरकारला भोंगे हटवण्यासाठी अल्टिमेटम दिलं आहे. पण काही मौलवींनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवताना मशिदींवरील भोंगे उतरवणार नसल्याची भूमिका जाहीर केल्याने आता काही ठिकाणी कायदा सुव्यवस्थाची स्थिती तणावग्रस्त होत असल्याचं चित्र आहे. सध्या राज्य सरकार कडून गृहमंत्र्यांनी येत्या 1-2 दिवसांत लाऊडस्पीकरच्या वापरावरून नियमावली जाहीर केली जाईल अशी माहिती दिली आहे. पण सध्या मुंबईत कोणत्या ठिकाणी किती डेसिबलच्या आवाजात लाऊडस्पीकरला परवानगी आहे भारत हा विविध संस्कृतींचा, जाती-धर्मांनी सजलेला देश आहे. त्यामुळे वर्षभर सतत प्रत्येक धर्म, जाती,पंथानुसार वेगवेगळे सण साजरे होत असतात. भारतीय सण आणि जल्लोष हे समीकरणच असल्याने अनेकदा लाऊडस्पीकर सर्रास वापरले जातात. मग जाणून मुंबई पोलिस कायद्याप्रमाणे कोणत्या भागात किती डिसिबल आवाजात लाऊडस्पीकर वाजवायला परवानगी देतात

, सध्या मुंबई मध्ये इंडस्ट्रीअल झोन, कमर्शिअल झोन रेसिडेंशिअल झोन आणि सायलंस झोन अशा चार विभागात वर्गवारी करून तेथे सकाळी आणि रात्री दोन सत्रात लाऊडस्पीकर लावण्यसाठी वेगवेगळ्या डेसिबलमध्ये परवानगी दिली जाते.

संबंधित पोस्ट

वर्ष अखेरीस पेट्रोल-डिझेलचे दर स्वस्त की महाग? जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

vishwatmaklokswamivarta

संस्कृती, मराठी भाषा आणि तंत्रज्ञानाचा समन्वय काळाची गरज – मंत्री ॲड.आशिष शेलार पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत ३ दिवसीय व्याख्यानमाला

vishwatmaklokswamivarta

राज्यातल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या देदिप्यमान यशाचं प्रतिबिंब आगामी महापालिका निवडणुकीतही उमटेल असा विश्वास व्यक्त करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मानले मतदारांचे आभार .

vishwatmaklokswamivarta

‘द काश्मीर फाइल्स’च्या वादावर नाना पाटेकर यांची प्रतिक्रिया, म्हणाले – विनाकारण वाद निर्माण करणे योग्य नाही

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा,पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार २०२४ साठी**अर्ज करण्याचे सामाजिक वनीकरण विभागाचे आवाहन*