vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

गुजरातचा पाटीदार नेता हार्दिक पटेल  आज भाजपमध्ये  प्रवेश करणार

गुजरातचा पाटीदार नेता हार्दिक पटेल  आज भाजपमध्ये  प्रवेश करणार

नवी दिल्ली प्रतिनिधी: गुजरातचा पाटीदार नेता हार्दिक पटेल  आज भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार आहे. भाजपमध्ये (BJP) प्रवेश करण्यापूर्वी हार्दिक पटेलनं एक ट्विट केलंय. हार्दिक पटेलनं ट्विट करून लहान सैनिक म्हणून काम करणार असल्याचं सांगितलंय. हार्दिकनं गेल्या महिन्यात काँग्रेसच्या  प्रदेश कार्याध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.आज (गुरुवार) सकाळी केलेल्या एका ट्विटमध्ये हार्दिकनं म्हटलंय, ‘राष्ट्रहित, राज्यहित, जनहित आणि सामाजिक हित या भावनांसह मी आजपासून एका नव्या अध्यायाची सुरुवात करणार आहे. भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी  यांच्या नेतृत्वाखाली देशसेवेच्या कार्यात मी एक लहान सैनिक म्हणूनही काम करेन.’

हार्दिक पटेल आगामी विधानसभा निवडणूक लढवणारहार्दिक पटेल आगामी विधानसभा निवडणूक (Assembly Election) लढवणार असल्याचं सांगण्यात येतंय. हार्दिक सौराष्ट्रातील मोरबी किंवा अहमदाबाद जिल्ह्यातील त्याच्या मूळ गावामधील विरमगाम मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतो. त्यानं भाजपकडून निवडणूक लढवण्याचे संकेतही दिले आहेत.

हार्दिकची काँग्रेसला सोडचिठ्ठी हार्दिक पटेलनं 18 मे रोजी गुजरात काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदाचा, तसेच प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. काँग्रेसला सोडचिठ्ठी देताना हार्दिक म्हणाला होता, मला खात्री आहे की, माझ्या निर्णयाचं माझे सर्व सहकारी आणि गुजरातचे लोक स्वागत करतील. मला विश्वास आहे की, माझ्या या पावलानंतर मी भविष्यात गुजरातसाठी खरोखर सकारात्मक काम करू शकेन, असं त्यानं नमूद केलं होतं.

संबंधित पोस्ट

शिवसेना दसरा मेळावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला :जयदेव ठाकरे यांच्याकडून सीएम एकनाथ शिंदेंच्या कामाचे कौतुक; व्यक्त केली राज्यात शिंदे राज्य यावे अशी इच्छा

महिलांना उद्योगासाठी प्रवृत्त करून जिल्ह्यात उद्योग वाढीसाठी प्रयत्न करा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

vishwatmaklokswamivarta

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा राजभवन परिसरातील पेढ्यांची दुकाने बंद पडली असावीत, सामनाच्या अग्रलेखातून राज्यपालांवर खोचक टीका

महायुतीचं सरकार हे सर्वसामान्यांचं सरकार म्हणून उत्तम पद्धतीनं काम करत आहे महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मोठ्या मताधिक्यानं निवडून आणा.

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांंच्या जंगी सभेने वातावरणात बदल-जालना महानगर पालिका कुणी खाल्ली हे ते सांगत नाहीत-अर्जुनराव खोतकर!

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 तारखेला यापूर्वीच महायुती आणि महाविकास आघाडीची रणधुमाळी सुरू…

vishwatmaklokswamivarta