
मोठी बातमी । काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात राजीनामा देण्याच्या मनस्थितीत..
मुंबई प्रतिनिधी: या घडीला काँग्रेसच्या गोटातली आणखी एक धक्कादायक बातमी. विधानपरिषदेच्या निकालानंतर काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी, धुसफूसही उघड व्हायला लागली आहे. बाळासाहेब थोरात हे विधीमंडळ गटनेतेपदाचा राजीनामा देण्याच्या मनस्थितीत असल्याची सूत्रांची माहिती आहे.
काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी, काल आमदारांची फूट यावरुन बाळासाहेब थोरात नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. थोरात काँग्रेस विधीमंडळ गटनेतेपदाचा राजीनामा देण्याची सूत्रांची माहिती आहे.



