vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

रा का पार्टी अध्यक्ष शरद पवार यांचा निर्णय आणि पत्रकार परिषदेतील दांडी; अजित पवार यांंनी ट्विट केले

रा का पार्टी अध्यक्ष शरद पवार यांचा निर्णय आणि पत्रकार परिषदेतील दांडी; अजित पवार यांंनी ट्विट केले..

 

मुंबई प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन बाजूला होण्याचा निर्णय आपण मागे घेत असल्याची माहिती शरद पवार  यांनी पत्रकार परिषद घेऊन केली. पवार यांच्या आगोदरच्या निर्णयासोबतच या नव्या निर्णयाचीही जोरदार चर्चा झाली. दरम्यान, पत्रकार परिषदेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते अजित पवार  यांनी. अजित पवार या पत्रकार परिषदेला उपस्थित नव्हते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन बाजूला होण्याचा निर्णय आपण मागे घेत असल्याची माहिती शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद घेऊन केली. पवार यांच्या आगोदरच्या निर्णयासोबतच या नव्या निर्णयाचीही जोरदार चर्चा झाली. दरम्यान, पत्रकार परिषदेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते अजित पवार (Ajit Pawar) यांनी. अजित पवार या पत्रकार परिषदेला उपस्थित नव्हते. त्यामुळे इतकी महत्त्वाची पत्रकार परिषद असूनही अजित पवार यांची अनुपस्थिती सर्वांसाठी आश्चर्याचा विषय ठरला. राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया, मते येऊ लागली. प्रकरण वाढताच मग स्वत: अजित पवार यांनीच यावर स्वत: भाष्य करत प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतील अनुपस्थिती आणि अजित पवार यांची दांडी यावर स्वत: अजित दादा काय म्हणाले घ्या जाणून.

 

शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर अजित पवार यांनी आपला निर्णय जाहीर करताच अजित पवार यांनी ट्विटरद्वारे प्रतिक्रिया दिली. अजित पवार म्हणाले, राज्यातील,देशातील सर्वपक्षीय नेते,कार्यकर्त्यांचा आग्रह मान्य करुन आदरणीय शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहण्याचा घेतलेला निर्णय माझ्यासह पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा उत्साह वाढवणारा,महाविकास आघाडी,देशातील विरोधी पक्षांच्या एकीला बळ देणारा आहे.

 

साहेबांनी (शरद पवार) राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम रहावं या आग्रहास्तव अध्यक्ष निवड समितीनं त्यांच्या निवृत्तीचा निर्णय फेटाळून लावला. तेच अध्यक्षपदी कायम राहतील,हा निर्णय एकमतानं झाला.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे एक कुटुंब असून साहेबांच्या नेतृत्वाखाली पक्ष राज्यात,देशात उज्ज्वल यश संपादन करेल. दरणीय शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहण्याच्या निर्णयाचं मी स्वागत करतो. आपल्या सर्वांच्या आग्रहाखातर त्यांनी हा निर्णय घेतला असून त्यांचं वय आणि प्रकृतीची काळजी घेऊन आपण सर्वांनी येणाऱ्या काळात अधिक जबाबदारी उचलावी, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.

संबंधित पोस्ट

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या निवासस्थानी जाऊन अजित पवार यांनी घेतली सदिच्छा भेट.

vishwatmaklokswamivarta

जिल्हयातील 210 सार्वत्रिक ग्रामपंचायती, 69 ग्रामपंचायती, 99 सदस्य तसेच 10 सरपंच रिक्त पदांसाठी 5 नोव्हेंबरला मतदान; निवडणूक ठिकाणी आचारसंहिता..

रक्तदान शिबिर मालिकेत जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे ⁠112 पिशव्या रक्त संकलित- दोन शिबिरातून एकूण 213 पिशव्या रक्त संकलन

vishwatmaklokswamivarta

मी भाजप चालवत नाही, मी फक्त विनंती केली आहे, अखेर ‘त्या’ पत्रावर राज ठाकरेंनी दिले स्पष्टीकरण..

vishwatmaklokswamivarta

त्यांना फक्त आरोप करायचे आणि दुसर्‍याने केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचे काम-अर्जुनराव खोतकर!

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांंच्या जंगी सभेने वातावरणात बदल-जालना महानगर पालिका कुणी खाल्ली हे ते सांगत नाहीत-अर्जुनराव खोतकर!

vishwatmaklokswamivarta