vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

तैवानमध्ये 6.9 तीव्रतेचा भूकंप तर पुढील काही तासांत त्सुनामीचा धोका

…तैवानमध्ये हाहाकार; गेल्या चोवीस तासांत भूकंपाचे 100 झटके, जापानला त्सुनामीचा अलर्ट

 

 विदेशप्रतिनिधी

 

तैवानला6.9 रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के बसले अ्सुन पुढील काही तासांत त्सुनामीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. युनायटेड स्टेट्स जिऑलॉजिकल सर्व्हेने (USGS) याबाबत अंदाज व्यक्त केला आहे

.

आग्नेय तैवानला (Taiwan) 6.9 रिश्टर स्केल भूकंपाचे (Earthquake) हादरे बसलेले आहेत. तरी पुढील काही तासांत 300 किलोमीटर किनारपट्टी परिसरात त्सुनामीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. युनायटेड स्टेट्स जिऑलॉजिकल सर्व्हेने (USGS) याबाबत अंदाज व्यक्त केला आहे. ग्रामीण आग्नेय तैवानमधील (southeastern Taiwan) चिशांग टाउनशिपला (Chishang township) भूकंपाचे (Earthquake) अधिक प्रमाणात धक्के बसले आहेत. जपानच्या (Japan) हवामान (Meteorological Agency) संस्थेने पूर्व चीन समुद्रातील (East China Sea) मियाको बेटासाठी (Miyako Island) सुनामीचा इशारा जारी केला होता परंतु काही कालावधीनंतर तो अलर्ट (Alert) काढून टाकण्यात आला होता. तरी  6.9 तीव्रतेच्या भूकंपाने मोठं नुकसान झाल्याची माहिती पुढे येत आहे.

 

शक्तिशाली भूकंपानंतर दक्षिण तैवानमध्ये (South Taiwan) कोसळलेल्या इमारती फोटो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल (Social Media Viral) होताना दिसत आहेत.तरी काही इमारतींच्या खाली लोक अडकले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या मोठ्या भूकंपानंतर आग्नेय तैवानचं मोठं नुकसानं झालं आहे. धावत्या रेल्वे (Railway), शाळा (School), सार्वजनिक ठिकाणांचं मोठं नुकसान झाल्याची माहिती सीएनएन (CNN) कडून प्रसारित करण्यात आली आहे

 

 

संबंधित पोस्ट

कॅनडाचा अधिकारी दहशतवादी कारवायांमध्ये गुंतला; भारताने ट्रुडो सरकारला पाठवले फोटो आणि नाव..

vishwatmaklokswamivarta

सीरियाच्या इदलिब प्रांताला भूकंपाचा धक्का…

vishwatmaklokswamivarta

ब्राझीलमध्ये पावसाचा हाहाकार; रिओ ग्रांदे डो सुल राज्यात वादळ आणि महापूर

vishwatmaklokswamivarta

भारतीय हवाई दल आजपासून फ्रान्समध्ये होणाऱ्या गरुड २५ या द्विपक्षीय हवाई सरावाच्या ८ व्या आवृत्तीत सहभाग

vishwatmaklokswamivarta

लंडन ब्रीज फायर व्हिडिओ व्हायरल: लंडन ब्रिजजवळ भीषण आग, रेल्वे वाहतूक विस्कळीत, अग्निशमन दलाच्या 10 गाड्या दाखल

पाकिस्तान मशिदीत बॉम्बस्फोट, 30 ठार 50 जखमी…