vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

असोसिएशन ऑफ नॅशनल एक्सचेंज मेंबर्स ऑफ इंडिया (ANMI) १२ व्या आंतरराष्ट्रीय अधिवेशन मुंबईमध्ये आज पार पडले. त्यावेळी केंद्रीय मंत्री मा. नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

 असोसिएशन ऑफ नॅशनल एक्सचेंज मेंबर्स ऑफ इंडिया (ANMI) १२ व्या आंतरराष्ट्रीय अधिवेशन मुंबईमध्ये आज पार पडले. त्यावेळी केंद्रीय मंत्री मा. नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

भांडवली बाजारातील सुधारणा आणि वाढीच्या मार्गांवर चर्चा आवश्यक : ॲन्मीच्या १२ व्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनातील सूर- सर्व आर्थिक मध्यस्थांसाठी सायबर सुरक्षेसाठी एक योग्य आराखडा तयार करण्यासाठी सेबीच्या मार्गदर्शनाखाली MI संयुक्तपणे सायबर सुरक्षा समितीची स्थापना केली जात आहे.

– भारतीय भांडवली बाजारातील टप्पे साजरे करतात जसे की १० कोटी डीमॅट खाते आणि जागतिक स्तरावर ५ व्या क्रमांकाचे मार्केच कॅप.

– उदयोगातील दिग्गज भारतीय भांडवली बाजाराच्या वाढीचा वेगा आणि इक्विटी संस्कृतीचा प्रसार करताना सर्वसमावेशक वाढीचा अजेंडा सुरू ठेवण्यासाठी आवश्यक सुधारणांवर विचार करत आहे

ऑक्टोबर, २०२२ : “अमृत काळ- वाढीच्या मार्गावर चालणाऱ्या भांडवली बाजारातील सुधारणांची पोहोच साजरी करणे”. या मुद्द्याच्या अनुषंगाने भारतातील सर्वात मोठी स्टॉक ब्रोकर संस्था, असोसिएशन ऑफ नॅशनल एक्स्चेंजेस मेंबर्स ऑफ इंडिया (ANMI)ने आज मुंबईतल १२व्या वार्षिक आंतरराष्ट्रीय अधिवेशनाचे आयेजन केले होते.

 

युनायटेड किंगडम सारख्या विकसित देशांना मागे टाकून मुल्यांबाबत जागतिक पाच क्लब मध्ये स्थान मिळवण्यासह  भारतीय इक्विटी मार्केटच्या अलिकडच्या यशाबाबत चर्चा झाली. ७४०० हून अधिक सार्वजनिक कंपन्या सूचीबद्ध आहेत आणि भारताच्या मार्केट कॅपने USD 3 ट्रिलियनचा नवीन विक्रम केला आहे.डीमॅट खात्यांची संख्या झपाट्याने वाढली आणि १० कोटींचा टप्पा गाठला.

मा. नितिन गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री, भारत सरकार हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तर, अश्वनी भाटिया, सेबीचे पूर्णवेळ सदस्य हे विशेष अतिथी होते.

 

“भारताच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आर्थिक बाजारपेठांनी नविन्यपूर्ण मॉडेल्स आणणे आवश्यक आहे. आम्ही पीपीपी मॉडेलमध्ये गुंतवणकीला आमंत्रित करत आहोत. जर आपण आपली गुंतवणूक कचा व्यवस्थापन, ग्रीन हायड्रोजन, सोलर आणि अशा अनेक प्रकल्पांसाठी केली तर आपण जगभरात ऊर्जा निर्यात करू शकतो. नवोन्मेशद्,उद्योजकता, विज्ञान आणि तंत्रज्ञान ही भारताची भविष्यातील संपत्ती आहे.” – मा. नितिन गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री, भारत सरकार.

 

 

भारतातील आर्थिक बाजारपेठांच्या विकासासाठी आणि वाढीसाठी अनेक तेजस्वी कल्पना निर्माण होतील. या परिषदेचा मुद्दा अमृत कालवर आधारीत असून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी आहे.- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री.

 

“हे अधिवेशन जागतिक गुंतवणूकदार सप्ताहाच्या अनुषंगाने आहे. ANMIची आज व्यापक पोहोच आहे व ती tier II, III व IV मार्केटमधील गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचण्यात सक्षम आहे. आम्ही सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात दलालांसोबत सल्लागार समिती सुरू करत आहोत. या उपक्रमांतर्गत, आम्ही जागरूकता उपक्रमांद्वारे MII व व्यापारी सदस्यांमध्ये एक मजबूत प्रणाली तयार करणार आहोत.” –  अश्वनी भाटीया, सेबीचे पूर्णवेळ सदस्य.

 

“असोसिएशन ऑफ एक्सचेंज मेंबर्स ऑफ इंडिया (ANMI)ला स्टॉक एक्सचेंजच्या सहकार्याने स्थापन करण्यात आलेल्या सिक्युरिटीवरील SEBI समितीसाठी सदस्यांना ऑनबोर्डिंग करण्याचे महत्त्वाचे काम सोवपण्यात आले आहे. समितीला सर्व आर्थिक मध्यस्थांसाठी सायबर सुरक्षेसाठी एक योग्य फ्रेमवर्क करणे बंधनकारक आहे.”- कमलेश शाह, अध्यक्ष, ANMI

 

समिती काही SOC एजन्सींसोबत करार करण्याच्या विचारात असून, जे आर्थिक संस्थांसाठी सायबरसुरक्षा अनुपालनाची वैध प्रमाणपत्रे जारी करतील. बाजार नियामक SEBI ANMI सोबत भारतीय भांडवली बांजारात सायबर सुरक्षेशी संबंधित जोखीम आणि सर्वोत्तम पद्धतींबद्दल जागरुकता निर्माण करण्याची योजना आखत आहेत. उत्तम सायबर सुरक्षा उपायांच्या अंमलबजावणीमुळे आर्थिक बाजारपेठेचि सुरक्षा आणि विकास सुनिश्चित होईल. सर्व आर्थिक मध्यस्थ पुढील १२ ते १८ महिन्यांत सायबर अनुपालनाची अपेक्षा करतो. असेही ते पुढे म्हणाले.

त्याचबरोबर आमच्याकडे काश्मीर ते कोचीन आणि आसाम ते अहमदाबादपर्यंत सदस्य संख्या आहे. ANMI च्या १२ व्या आंतरष्ट्रीय परिषदेचे हे यश असल्याचेही ते म्हणाले.

 

“उद्योग सदस्यांची फ्लॅग-बिअरर संघटना म्हणून ANMI नेंहमीच भारताच्या भांडवली बाजारातील बदलांची अंमलबजावणी करण्यात आघाडीवर असते. सरकारने मजबूत नियामक नियमांसह एक प्रचंड गुंतवणूक इकोसिस्टम तयार केली आहे. ज्यामुळे भारतीय भांडवली बाजार जागतिक स्तरावर सर्वात फायदेशीर गुंतवणूक पर्याय बनला आहे. भारताने आज जागतिक स्तरावर सर्वाधिक गुंतवणुकीच्या संधींसह ५वी मोठी अर्थव्यवस्था होण्याचा मान मिळवला आहे.- कमलेश श्रॉफ, निमंत्रक, १२वे आंतरराष्ट्रीय अधिवेशन

 

भविष्यातील नवीन फायदेशीर गुंतवणुकीच्या मार्गांचा शोध घेण्याचा प्रयत्न स्टॉक एक्सचेंज व डिपॉझिटरीच्या नेतृत्वाखाली घेण्यात आल्याची चर्चा यावेळी करण्यात आली. संशोधन आणि वाढीच्या संधींच्या बाबत भारतीय शेअर बाजाराला अमेरिकन बाजारांपेक्षा फायदा आहे का  याबाबतही तज्ज्ञांनी चर्चा केली.

 

देशांतर्गत इक्विटी मार्केटमध्ये गुंतवणुकीचा वेग वाढविण्यासाठी आवश्यक असलेल्या तात्काळ धोरणात्मक सुधारणांवर तसेच सायबर सुरक्षा तपासण्यांसह तांत्रिक क्षेत्राची भूमिका आणि आव्हाने यांवर लक्ष केंद्रित करण्यात आल्याबाबतही यावेळी चर्चा झाली.

ANMI बाबत :

 

असोसिएशन ऑफ नॅशनल एक्सचेंज मेंबर्स ऑफ इंडिया (ANMI) ही एक संघटना आहे. यात देशभरातील सुमारे ९०० स्टॉक ब्रोकर्स आहेत. नॅशनल स्टटक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, मल्टी कमॉडिटी एक्सचेंज आणि राष्ट्रीय उपस्थिती असलेल्या इतर एक्सचेंजचे सदस्य आहेत.

ANMIचे मूळ उद्दीष्ट भांडवली बाजाराच्या वाढीसाठी काम करणे हे आहे. देशाच्या आर्थिक विकासात आणि गुंतवणूकदारांचे आणि सदस्यांचे एकूण हीत साधण्यासाठी, एक्सचेंज आणि सहभागी यांच्यामध्ये एक माध्यम बनून योगदान देते.

संबंधित पोस्ट

जगातील सर्वात मोठं विमान मुंबईत दाखल! एअरबस बेलुगा विमानाचं मुंबई विमानतळावर लॅंडिंग

vishwatmaklokswamivarta

विशेष लेखः-अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजना

प्रमाणित बियाणे वितरण बाबीमध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड जिल्ह्यांकरीता लक्षांक प्राप्त

vishwatmaklokswamivarta

चिखलीतील शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी ॲपद्वारे शेतातील पिकाची नोंदणी करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद ठाणे राष्ट्रीय पशुधन विकास अभियानांतर्गत उद्योजकता निर्माण करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन,पशुसंवर्धन विभागामार्फत पशुपालकांना कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन

शिकाऊ, पक्की अनुज्ञप्तीच्या कामकाजासाठी-तालुकानिहाय शिबीर वेळापत्रक जाहीर

vishwatmaklokswamivarta