vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

जिल्हा परिषद ठाणे राष्ट्रीय पशुधन विकास अभियानांतर्गत उद्योजकता निर्माण करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन,पशुसंवर्धन विभागामार्फत पशुपालकांना कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन

जिल्हा परिषद ठाणे राष्ट्रीय पशुधन विकास अभियानांतर्गत उद्योजकता निर्माण करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन,पशुसंवर्धन विभागामार्फत पशुपालकांना कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन

 

 

जि.प.ठाणे,  पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन व जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानाने केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पशुधन विकास अभियानांतर्गत उद्योजकता निर्माण करण्याच्या दृष्टीने ठाणे जिल्ह्यात दि. ६ ऑगस्ट आणि ७ ऑगस्ट या दोन दिवशी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळा ही रोटरी कम्युनिटी क्लब, वडवली, अंबरनाथ या ठिकाणी सकाळी ९:३० वाजता आयोजित केली आहे.

 

या कार्यशाळेमध्ये राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत येणाऱ्या विविध योजनेचे तपशील, बारकावे व योजनेचा अर्ज कसा करावा याविषयी सखोल मार्गदर्शन तज्ञांद्वारे करण्यात येणार आहे.

 

या योजनेमध्ये अर्ज प्रक्रिया ज्या लाभार्थ्यांनी पूर्ण केली आहे किंवा जे लाभार्थी यशस्वीरित्या शेळीपालन, कुक्कुटपालन व्यवसाय करत आहेत त्यांचे स्वः अनुभव व मार्गदर्शन कार्यशाळेमध्ये करण्यात येणार आहेत.

 

 

पशुपालकांनी कार्यशाळेत नोंदणी करण्यासाठी आपल्या नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखाना किंवा तालुक्यातील पंचायत समिती, पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा व नाव नोंदणी करावी. ठाणे जिल्ह्यातील सर्व पशुपालकांना सदर कार्यशाळेत मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात येत आहे.

०००

संबंधित पोस्ट

भाजपा सदस्य नोंदणी अभियानांतर्गत जालना जिल्ह्याचा राज्यात पाचवा क्रमांक,मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांच्याहस्ते जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे यांचे अभिनंदन

vishwatmaklokswamivarta

दिपावली सणानिमित्त फटाके परवान्यासाठी अर्ज सादर करावेत

घटस्फोटानंतर मुलाला भेटायला आलेल्या वडिलांना चहा/नाश्ता देण्याचा आदेश रद्द; मद्रास हायकोर्ट चा निर्णय

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रातील लातूर येथे आज केरला द स्टोरी चित्रपट मा श्री श्रावण जी जंगम मित्रपरिवार तर्फे 200 जणांना दाखवण्यात आला

ग्रामीण भागात जिल्हा परिषदेकडून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ची प्रभावी अंमलबजावणी

कोकणाचा जलदगतीने विकास करण्यासाठी रस्ते, महामार्ग उभारणार *– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे