
भारत ब्रिटेन सोबत काम करण्यास उत्सुक, पंतप्रधान मोदींकडून ब्रिटेनचे नवनिर्वाचित पंतप्रधान ऋषी सुनक यांना अनोख्या शुभेच्छा. .
नवी दिल्ली प्रतिनिधी
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्वीट करत ऋषी सुनक यांना अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत.
लिझ ट्रस )यांच्या राजीनाम्यानंतर काल म्हणजेच दिवाळीच्या (मुहूर्तावर अखेर ब्रिटेनला नवा पंतप्रधान मिळाला. भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांनी पेनी मॉर्डॉंट यांचा पराभव करत ब्रिटनचे नवे पंतप्रधान होण्याचा मान मिळवला आहे. तरी 28 ऑक्टोबर रोजी ऋषी सुनक (Rishi Sunak) पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. दिवाळीच्या (Diwali) मुहूर्तावर पहिले भारतीय वंशाचे ब्रिटनचे पंतप्रधान झाल्याने ब्रिटेनसह भारतातत देखील मोठा आनंद व्यक्त करण्यात येत आहे. भारतीय राजकीय मंडळी, सिनेअभिनेते तसेच सर्व सामान्यांकडून ब्रिटेनचे नवनिर्वाचित पंतप्रधान ऋषी सुनक (PM Rishi Sunak) यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्वीट (PM Modi tweet) करत ऋषी सुनक यांना अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत.
भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटेनचे पंतप्रधान झाल्याबाबात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुनक यांना विशेष शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी ट्वीट (PM Modi tweet) करत म्हणाले, पंतप्रधान सुनक यांच्या सोबत जागतिक समस्यांवर एकत्र काम करण्यासाठी आणि रोडमॅप 2030 ची अंमलबजावणी करण्यास भारत उत्सुक आहे. भारतीय वंशाचे ऋषी सुनक पंतप्रधान झाल्याने भारत-ब्रिटेन ऐतिहासिक संबंधांचं आधुनिक भागीदारीत रूपांतरित होईल असं पंतप्रधान मोदी आपल्या ट्वीट मधून व्यक्त झाले आहेत



