
राहुल गांधी यांची: भारत जोडो यात्रा वाशिम जिल्ह्यात दाखल…
विदर्भ प्रतिनिधी
भारत जोडो यात्रा आज विदर्भाच्या वाशिम जिल्ह्यात प्रवेश केला आहे. भारत जोडो यात्रेस मराठवाड्यातून उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला असुन आता विदर्भवासियांकडून देखील राहुल गांधींचे दणक्यात स्वागत करण्यात आले आहे.
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा आज महाराष्ट्रात नववा दिवस आहे. नांदेड जिल्ह्याच्या देगलूर येथून महाराष्ट्रात प्रवेश केलेली भारत जोडो यात्रा आज विदर्भाच्या वाशिम जिल्ह्यात प्रवेश केला आहे. येथे राहुल गांधींचं विशेष स्वागत करण्यात येणार आहे. वाशिम येथील अंजनखेडी या गावात भारत जोडो यात्रा दाखल झाली आहे. आज संध्याकाळी ७ वाजता राहुल गांधी सभा घेणार आहे. तसेच विदर्भवासियांचे प्रश्न समजून घेणार आहेत. भारत जोडो यात्रेस मराठवाड्यातून उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला असुन आता विदर्भवासियांकडून देखील राहुल गांधींचे दणक्यात स्वागत करण्यात आले आहे. दरम्यान विदर्भातील बरेच कॉंग्रेसचे महत्वाचे नेते या यात्रेस हजेरी लावणार आहेत. राज्यातील विविध दिग्दज नेत्यांसह काही सिनेअभिनेत्यांनी देखील या यात्रेस उपस्थिती नोंदवली आहे. तरी आजचा दिवेस भारत जोडो यात्रेसाठी खास आहे. तरी राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) या भारत जोडो यात्रेस (Bharat Jodo Yatra) मिळणारा सहभाग कौतुकास्पद आहे.
भारत जोडो यात्रा हिंगेली जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्यात येवून पोहोचली आहे. यानंतर ही यात्रा बुलढाणा आणि अकोला (Akola) या जिल्ह्याच्या दिशेने रवाना होणार आहे. म्हणजेचं राहुल गांधींच्या या भारत जोडो यात्रेत मराठवाडा आणि विदर्भातली (Vidarbha) जिल्हे केंद्रस्थानी आहेत. तरी राज्यातील एकूण १४ दिवसांच्या कालावधी पैकी आज भारत जोडो यात्रेचा नववा दिवस आहे.



