vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

चैत्यभूमीचा स्तूप दीक्षाभूमीसारखा भव्य दिव्य उभारण्यात यावा – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले*

 चैत्यभूमीचा स्तूप दीक्षाभूमीसारखा भव्य दिव्य उभारण्यात यावा – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले*

मुंबई प्रतिनिधी  – महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर चैत्यभूमी उभारण्यात आली. चैत्यभूमीच्या बांधकामाला आता 65 वर्षे होत आहेत. चैत्यभूमीच्या स्तूपाची पावसात जीर्णत्वामुळे थोडे प्लास्टर ची पडझड झाल्याच्या घटना घडल्या आहेत.त्यामुळे तिथे केवळ डागडुजी न करता नवीन भव्यदिव्य स्तूप उभारला पाहिजे.चैत्यभूमीच्या शेजारी इंदूमिल मध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारले जात आहे.त्यामुळे आता चैत्यभूमीचा स्तूप ही भव्यदिव्य उभारला पाहिजे.परम पूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थींचे संरक्षण करुन चैत्यभूमीचा स्तूप भव्य प्रमाणात उभारण्याला आंबेडकर कुटुंबयांनी सहकार्य केले पाहिजे. तसेच मुंबई महापालिका आणि राज्य सरकार ने या प्रकरणी लक्ष घालून चैत्यभूमीचा भव्य दिव्य स्तूप उभारला पाहिजे अशी सूचना आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केली आहे. चैत्यभूमी येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना ना. रामदास आठवले यांनी चैत्यभूमीचा स्तूप नवीन बांधण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले.

संबंधित पोस्ट

राज्यातील 🚨 पोलादपूरात मुसळधार पाऊस !  सह्याद्री डोंगररांगांमध्ये रात्रभर १०५ मिमी पावसाची नोंद, एकूण पावसाची नोंद १५७१ मिमीवर! 🌊 सावित्री नदी उत्तर वाहिनीने पात्र ओसंडले. 🏠 शहरातील मंदिर, घाट, मार्केट पाण्याखाली….

रेशन न घेतल्यास रेशनकार्ड होणार रद्द

एआरटी सेंटरला 20 वर्षे पूर्ण*उत्कृष्ट कार्याबद्दल कर्मचाऱ्यांचा गौरव

मुख्यमंत्री कृती कार्यक्रमांतर्गत आदिवासी भागात सौरऊर्जेचा प्रभावी उपयोग — जिल्हाधिकारी किशन जावळे

इंग्लंडच्या प्रिन्स एडवर्ड यांची राज्यपालांशी भेट;भारत – ब्रिटन परस्पर सहकार्य वाढविण्यावर चर्चा…

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्याचा शाश्वत विकास साधण्यासाठी कटिबद्ध- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- भारतीय स्वातंत्र्याचा 79 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न – स्वातंत्र्याच्या शताब्दीपर्यंत तीन टप्प्यांसाठी जिल्ह्याचा विकास आराखडा निश्चित- जिल्ह्याच्या सर्वसमावेशक विकासाच्या नियोजनाची अंमलबजावणी सुरू