vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

: शेअर बाजारात पडझडीचं सत्र सुरू, सेन्सेक्स 501 अंकानी गडगडला

Share Market: शेअर बाजारात पडझडीचं सत्र सुरू, सेन्सेक्स 501 अंकानी गडगडला..

 

व्यापारी प्रतिनिधी

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार गडगडल्याचे दिसून येत आहे. शेअर बाजार सध्या घसरणीच्या मार्गावर आहे. 501 अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स 61 हजार 153 च्या पातळीवर आला आहे, तर निफ्टी 155 अंकांनी घसरून 18 हजार 152च्या पातळीवर व्यवहार करत आहे. आज सकाळच्या सत्रात 13 शेअर तेजीत असून 37 शेअर घसरणीसह व्यवहार करत आहेत. 

शुक्रवारी सलग दुसऱ्या बाजारात घसरण दिसून आली. व्यवहाराच्या शेवटी निफ्टी 36 अंकांनी घसरून 18308 वर बंद झाला. पण लाल चिन्हावर बंद होऊनही, निफ्टीने 18300 ची महत्त्वपूर्ण पातळी राखण्यात यश मिळविले.आता जर निफ्टी या पातळीच्या खाली घसरला तर आपण 18100-18000 च्या दिशेने जाताना पाहू शकतो. आणि जर ते 18300 च्या वर राहिला तर 18450-18500 च्या लेव्हलपर्यंत जाऊ शकतो. वीकली टाइम फ्रेमवर, निफ्टीने बियरिश कँडल तयार केली जी स्पिनिंग टॉप फॉर्मेशन सारखी दिसते. जे बाजाराची दिशा स्पष्ट नसल्याचे द्योतक

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?शॉर्ट टर्म मोमेंटम इंडिकेटर निगेटिव्ह डायव्हर्जन दाखवत आहे, जे बाजारातील आणखी कमजोरी दर्शवत असल्याचेशेअरखानचे गौरव रत्नपारखी यांचे म्हणणे आहे. शॉर्ट टर्ममध्ये, निफ्टी खाली 18100-18000 च्या दिशेने जाताना पाहू शकतो, तर वरच्या बाजून, निफ्टीचा रझिस्टंस 18450 वर दिसतो. शॉर्ट टर्ममध्ये बाजारात मोठी घसरणही शक्य आहे.

 

 

 

संबंधित पोस्ट

मुंबईत उद्यापासून होणार ग्लोबल फिनटेक फेस्ट 2025 चे आयोजन

अक्षय्यतृतीया दिवशी तुमच्या शहरात इंधनाचे दर काय? घ्या जाणून

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ यशकथा भाग 3 अण्णासाहेब पाटील महामंडळाचा आधार जिल्ह्यातील उद्योजकांचे स्वप्न साकार,- वैयक्तिक कर्जासाठी 83 कोटी, गट प्रकल्प कर्जासाठी सहा कोटींचा व्याज परतावा.

vishwatmaklokswamivarta

राज्य परिवहन महामंडळ बुलढाणा विभागात विविध पदासाठी भरती- शिकाऊ उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन

उद्योग विभाग, जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने निर्यातीसंदर्भातील कार्यशाळा संपन्न,ठाणे जिल्हा निर्यातीत अग्रेसर राहण्यासाठी इग्नाइट कार्यशाळा उपयुक्त – जिल्हाधिकारी अशोक शिनगारे

vishwatmaklokswamivarta

निर्यात प्रचालन कार्यशाळा सोमवारी (दि.२३)

vishwatmaklokswamivarta