
संपूर्ण देशाला हादरवून सोडणारा बहुचर्चित श्रद्धा वालकर हत्याप्रकरणी मुंबई पोलीस यांचीही चौकशीचे,केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
नवी दिल्ली प्रतिनिधी
आताची सर्वात मोठी बातमी. मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. खुद्द केंद्रीय अमित शाह यांनी श्रद्धा वालकर हत्येसंदर्भात संकेत दिले आहेत. ‘मुंबई आणि दिल्ली पोलिसांमध्ये समन्वयचा अभाव आहे’, असं शाह यांनी म्हटलं आहे.
श्रद्धा वालकर प्रकरणावर माझी नजर असल्याचं अमित शाह यांनी सांगितलं. त्याशिवाय या प्रकरणातील आरोपीला लवकरात लवकर कडक शिक्षा देण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं. श्रद्धा हिने मुंबईतील वसई पोलीस ठाण्यामध्ये 2020 मध्ये आफताबची लेखी तक्रार केली होती. ”त्या तक्रारीमध्ये श्रद्धाने सांगितलं होतं की तिचे तुकडे-तुकडे करुन मारण्याची धमकी देण्यात आली आहे आणि तिच्या जीवाला धोका आहे. या तक्रारीवर कुठलीही कारवाई झाली नाही. त्यावेळी पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही. 2020 मध्ये आमचं सरकार नव्हतं. पण यासाठी जो कोणी जबाबदार आहे त्यांच्यावर कारवाई केली जाईल”, असं संकेत अमित शाह यांनी दिले आहेत. त्यामुळे मुंबई पोलिसांची चौकशी होण्याची चर्चा रंगली आहे.
मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनीही श्रद्धा वायकर हिने लिहिलेल्या पत्रावर कारवाई करण्याबाबत महाराष्ट्र पोलिसांच्या कथित अपयशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्र पोलिसांसमोर मोठं संकट उभं ठाकलं आहे.
दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार श्रद्धाने ही तक्रार मागे घेतली होती. त्यामुळे मुंबई पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही.



