vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

कर्नाटक प्रश्नावरुन उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका

कर्नाटक प्रश्नावरुन उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका…

मुंबईचे प्रतिनिधी

 

आमचे मुख्यमंत्री नवस फेडण्यासाठी आसामला कामाख्या मंदिरात जातात. परंतू, बेळगावच्या प्रश्नावर मात्र त्यांना नवस बोलावेसे वाटत नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले आहे. आमचे मुख्यमंत्री गुवाहाटीवरून आल्यानंतर शांत का? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.

कर्नाटकचे मख्यमंत्री बोम्मई यांनी केलेल्या विधानावरुन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री दररोज नवनवी विधाने करुन वाद निर्माण करत आहे. आपले राज्याचे मुख्यमंत्री मात्र त्यावर एक शब्द न बोलता मौन बाळगून आहेत. आमचे मुख्यमंत्री नवस फेडण्यासाठी आसामला कामाख्या मंदिरात जातात. परंतू, बेळगावच्या प्रश्नावर मात्र त्यांना नवस बोलावेसे वाटत नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले आहे. आमचे मुख्यमंत्री गुवाहाटीवरून आल्यानंतर शांत का? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.

प्रत्येक राज्यांमध्ये इतर राज्यांची भवनं असतात. त्यामुळे मध्यप्रदेशमध्ये अयोध्येतही महाराष्ट्र भवन असावे अशी घोषणा आम्ही केली होती. या घोषणेला जर या सरकारने स्थगिती दिली असेल तर त्याबाबत आपल्याला माहिती नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडून महाराष्ट्र आणि कर्नाटक यांचे नाते काय आहे याबाबत ऐकायला आले नाही. ते (कर्नाटक) जर महाराष्ट्रात कर्नाटक भवन बांधत असतील तर , वृत्तपत्रात आजच मी वाचले की त्यांनी (कर्नाटक) सरकारने महाराष्ट्राच्या मंत्र्यांना कर्नाटकात यायला मज्जाव केला आहे.मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिल्याचे आम्ही ऐकले नाही असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

कर्नाटक वारंवार महाराष्ट्राची कळ काढत आहे. आताही त्यांनी आपल्या तलावात पाणी सोडले आहे. आणि आपले सत्ताधाीर त्या पाण्यात गटांगळ्या खात आहेत. या नेभळटांविरुद्ध आपण ताठ मानेने उभा राहिले पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

 

संबंधित पोस्ट

लोकसभा निवडणूक- 2024आचारसंहितेत उत्पादन शुल्क विभागाचा अवैध दारू विक्री विरुद्ध फास…!एक महिन्यात 94 गुन्हे, 18 लाखांचा मुद्देमाल जप्त

आदिशक्ती अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठीग्रामस्तरावर १५ दिवसांत समित्या स्थापन करा- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या लोकांना वाहिली श्रद्धांजली

vishwatmaklokswamivarta

दिव्यांग कल्याणासाठी यंत्रणांनी संवेदनशीलपणे काम करावे-दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू

vishwatmaklokswamivarta

मतमोजणी केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा-सर्व विभागांच्या समन्वयातून ‘आषाढी वारी’ यशस्वी करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश..