vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मतमोजणी केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

मतमोजणी केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

 

बुलडाणा, प्रतिनिधी: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी मंगळवार, दि. 4 जून रोजी सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होणार आहे. मलकापूर रोडवरील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ही मतमोजणी होणार आहे. या परिसरातील 200 मीटर परिक्षेत्रात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहे.

 

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत होणार आहे. ही प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून तसेच मतमोजणीच्या ठिकाणी नागरीकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी मतमोजणी परिसरातील 200 मीटर परिक्षेत्रात फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 लागू करण्यात आले आहे.

 

जिल्हादंडाधिकारी डॉ. किरण पाटील यांना प्राप्त अधिकारानुसार दि. 4 जून 2024 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून ते मतमोजणीचे काम पूर्ण होईपर्यंत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या 200 मीटर परिक्षेत्रात 5 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येवून जमाव करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 लागू करण्यात आले आहे. सदर आदेश अधिकारी, कर्मचारी, पोलिस अधिकारी, सुरक्षा पथकातील कर्मचारी तसेच अंत्ययात्रा, लग्नसोहळा, धार्मिक कार्यक्रमांना लागू राहणार नाही.

 

00000

 

संबंधित पोस्ट

जुन्नर व शिरूर परिसरातील बिबट्यांचे तातडीने स्थलांतर करणार- वनमंत्री गणेश नाईक,वन्य प्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी महत्वाचे निर्णय-त्वरित 200 पिंजरे बसविणार, आणखी 1 हजार पिंजरे युद्धपातळीवर खरेदी करणार नागरिकांच्या जीवित रक्षणासाठी निधी कमी पडू देणार नाही· बिबट्यांच्या हालचालीची माहिती देण्यासाठी एआयचा वापर करणार· नसबंदीसाठी केंद्रीय वन मंत्र्यांना सर्वपक्षीय शिष्टमंडळ भेटणार· शेती व गोठ्यांना सौर कुंपण करणार

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात १० ते २८ फेब्रुवारी दरम्यान हत्तीरोग दूरीकरण मोहीम…

vishwatmaklokswamivarta

जनतेला शासकीय सेवांचा लाभ वेळेत मिळेल याची खबरदारी घ्या – मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव

कोयना धरणात 101.47 टीएमसी पाणीसाठापाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी कोयनेतून 95300 क्युसेकचा पाण्याचा विसर्ग….

फॅन्ट्सी किड्स स्कूलमध्ये शाळेचे हस्तकला प्रदर्शन : पालकांनी दिली दाद…

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री मोदींच्या हत्येची भाषा करणाऱ्या काँग्रेसच्या राजा पाटोरियाचा तीव्र निषेध त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

vishwatmaklokswamivarta