vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

धारावीतील संत रोहिदास समाज मंडळाचा होलिकोत्सव समाज बांधवांच्या उपस्थितीत साजरा

धारावीतील संत रोहिदास समाज मंडळाचा होलिकोत्सव समाज बांधवांच्या उपस्थितीत साजरा

मुंबई प्रतिनिधी: गेली साठ वर्षापेक्षा जास्त काळ धारावीत गुल मोहम्मद कोकणीचा संत कक्कया मार्ग परिसरात वास्तव्यात असलेल्या संत रोहिदास स्थानिक न्याती पंचायत तर्फे संत रोहिदास समाज मंडळ व महिला मंडळाच्या वतीने दिनांक दोन मार्च 2026 रोजी सायंकाळी सात ते नऊ या वेळात स्थळ कोकणी चाळ परिसर या ठिकाणी समाजातील बांधवांना एकत्र करून होळी उत्सव साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विभागातील नगरसेविका श्रीमती अर्चना शिंदे ज्येष्ठ समाजसेवक समाज बांधव श्री दिलीप गाडेकर उपविभाग प्रमुख महादेव शिंदे श्री परशुराम जाधव व ज्येष्ठ महिला श्रीमती गरुडे ही मान्यवर मंडळी उपस्थित होती
कार्यक्रमाचा ताबा संत रोहिदास महिला मंडळाच्या ताब्यात होता यावेळी समाजासाठी झटणाऱ्या उपयोगी पडणाऱ्या पैकी श्रीमती मंजुळा रमेश पाब्रेकर श्री कृष्णा हशा सावळेकर श्री मोहन आंबोलकर श्री परशुराम जाधव श्री बन्सी आंबोलकर या सर्वांना प्रमुख पाहुण्यांचे हस्ते जीवनगौरव 2026 पुरस्कार संत रोहिदास प्रतिमा शाल श्रीफळ भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे मांडणी अध्यक्ष अभिजीत हिरामण गरुड यांनी केली तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरिता आकाश सावळेकर यांनी केले सदर कार्यक्रमांमध्ये वैशाली सावळेकर नीता जाधव जागृती सावळेकर शितल गरुडे रेशमा सावळकर
रोहिणी जाधव व करुणा जाधव यांनी मनोगत विचार व्यक्त केले
सदर कार्यक्रमासाठी संतोष सावळेकर चंद्रकांत जाधव रवींद्र जाधव संजय कोईलकर सुनील खरुंजकर आकाश सावळकर व राजेश गव्हाणकर या सर्व पुरुष मंडळींनी पुढाकार घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मदत केली वृत्तसंकलन श्री दिलीप गाडेकर
कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व महिला भगिनींना भेटवस्तू व मिठाई देऊन होलिकोत्सव साजरा करण्यात आला आहे

00000

 

संबंधित पोस्ट

काळी-पिवळी मीटर टॅक्सी (सीएनजी) व ऑटोरिक्षा (सीएनजी) यांच्या1 फेब्रुवारी 2025 पासून भाडेदरात वाढ सुरु..

vishwatmaklokswamivarta

भव्य रक्तदान शिबीर व सत्संग सोहळा

पुण्यातील पिंपरी-चिंचवड विभागातील दुर्दैवी घटना-दरड कोसळल्याप्रमाणे कचरा इमारतीवर आला; पिंपरीमध्ये इमारत कोसळल्यानंतर अधिकाऱ्याने सांगितला घटनाक्रम, आतमधून मदतीसाठी आवाज….

vishwatmaklokswamivarta

ज्येष्ठ नागरिकांना माहिती, मदत आणि तक्रारींसाठी 14567 राष्ट्रीय हेल्पलाईन

vishwatmaklokswamivarta

लातूर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक नागरिकांकडून दहा जणांची सुखरूप सुटका; भारतीय सैन्याचे पथक लवकरच दाखल होणार

सुरक्षित इंटरनेट वापराबाबत कार्यशाळा संपन्नपैसे मागणाऱ्या अज्ञात नंबरवरील कॉल्सला उत्तर देऊ नका – जिल्हाधिकारी संतोष पाटील

vishwatmaklokswamivarta