vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

कोयना धरणात 101.47 टीएमसी पाणीसाठापाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी कोयनेतून 95300 क्युसेकचा पाण्याचा विसर्ग….

कोयना धरणात 101.47 टीएमसी पाणीसाठापाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी कोयनेतून 95300 क्युसेकचा पाण्याचा विसर्ग….

 राज्या प्रतिनिधी-सातारा – कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस वाढल्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे 12 फुटांवरून 13 फुटापर्यंत उघडून 95,300 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आले आहे. कोयना धरणाची प्रकल्पीय एकूण क्षमता 105.25 टीएमसी असून आज 20 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वा. पर्यंत 101.47 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे . कोयना धरण 93.66 टक्के भरले आहे. जिल्ह्यातील इतर धरणांची आज रोजी सकाळी 9 वा.पर्यंतची स्थिती पुढीलप्रमाणे आहे.

       धोम धरणाची प्रकल्पीय एकूण क्षमता टीएमसी 13.50 असून 13.18 टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून 97.85 टक्के धरण भरले आहे. धरणातून 17274 क्युसेक्स पाणी विसर्गाद्वारे नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

धोम-बलकवडी धरणाची प्रकल्पीय एकूण क्षमता 4.08 टीएमसी असून 3.82 टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून 97.79 टक्के धरण भरले आहे, धरणातून 7329 क्युसेक्स पाणी विसर्गाद्वारे नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

कण्हेर धरणाची प्रकल्पीय एकूण क्षमता 10.10 टीएमसी असून 9.57 टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून 96.93 टक्के धरण भरले आहे, धरणातून 14823 क्युसेक्स पाणी विसर्गाद्वारे नदीपात्रात सोडण्यात येत आहे

उरमोडी धरणाची प्रकल्पीय एकूण क्षमता 9.96 टीएमसी असून 9.72 टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून 98.29 टक्के धरण भरले आहे, धरणातून 8936 क्युसेक्स पाणी विसर्गाद्वारे नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

तारळी धरणाची प्रकल्पीय एकूण क्षमता 5.85 टीएमसी असून 5.45 टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून 94.28 टक्के धरण भरले आहे, धरणातून 4435 क्युसेक्स पाणी विसर्गाद्वारे नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

वीर धरणाची प्रकल्पीय एकूण क्षमता 9.83 टीएमसी असून 9.50 टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून 96.50 टक्के धरण भरले आहे, धरणातून 55887 क्युसेक्स पाणी विसर्गाद्वारे नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

सातारा जिल्ह्यात पावसाचा वाढता जोर असून धरण पाणलोट क्षेत्रात आज दि.20 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत झालेला पाऊस व एकूण पाऊस मिलीमीटरमध्ये पुढीलप्रमाणे कोयना- 270 मिमी.(3928 मि.मी.), नवजा 387 मिमी.(4822 मि.मी.),महाबळेश्वर 308 मिमी.(4508 मि.मी.),धोम 47 मिमी.( 561 मि.मी.), धोम बलकवडी 197मिमी.(2237 मि.मी.), कण्हेर 49 मिमी.(690 मि.मी.), उरमोडी 62 मिमी.( 1217 मि.मी.),तारळी 60 मिमी.(1336 मि.मी.), वीर 14 मिमी.( 210 मि.मी.)

000

संबंधित पोस्ट

राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा मिळणार – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २३ व्या हप्त्याचे वितरण

वाहनांना हाय सिक्यूरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट आवश्यक…

vishwatmaklokswamivarta

भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. भास्कर आबा दानवे यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे 

अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना मदत तसेच नवीन बसेसची मागणी केली आहे .*बेस्ट समिती अध्यक्षांना राजोल पाटील यांचे निवेदन; भांडुपच्या प्रश्नांकडे वेधले लक्ष*

गणेशोत्सवाच्या अनुषंगाने सांगली व मिरज शहरात वाहनांसाठी मनाई आदेश जारी..

पेट्रोरसायन अभियांत्रिकी व उद्योग संस्थेचा विनामूल्यप्लास्टिक प्रोसेसिंग अभ्यासक्रम; इच्छुकांकडून अर्ज मागविले

vishwatmaklokswamivarta