vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

विधान परिषद निवडणूक : लातूर जिल्ह्यात ३६७ मतदार बजाविणार हक्क• सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदानाचा कालावधी• संबंधित तालुकास्तरावर मतदान केंद्र; प्रशासन सज्ज

विधान परिषद निवडणूक : लातूर जिल्ह्यात ३६७ मतदार बजाविणार हक्क• सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदानाचा कालावधी• संबंधित तालुकास्तरावर मतदान केंद्र; प्रशासन सज्ज

 

लातूर, प्रतिनिधी उस्मानाबाद-लातूर-बीड विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ द्विवार्षिक निवडणुकीसाठी गुरुवार, १८ जून २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली असून जिल्ह्यातील ३६७ मतदार यावेळी आपला हक्क बजाविणार आहेत. मतदान प्रक्रिया भयमुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.

रेणापूर येथील तहसील कार्यालयातील मिटिंग हॉल (२५ मतदार), अहमदपूर येथील तहसील कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार यांचे दालन (३५ मतदार), जळकोट येथील तहसील कार्यालयातील मिटिंग हॉल (२३ मतदार), चाकूर येथील तहसील कार्यालयातील मिटिंग हॉल (२५ मतदार), लातूर येथील तहसील कार्यालयातील महसूल हॉल (८८ मतदार), उदगीर येथील प्रशासकीय भवन इमारतीतील तळ मजला खोली क्र. २ (५३ मतदार), शिरूर अनंतपाळ येथील तहसील कार्यालयातील व्ही. सी. रूम (२२ मतदार), देवणी येथील तहसील कार्यालयातील मिटिंग हॉल (२३ मतदार), औसा येथील तहसील कार्यालयातील मिटिंग हॉल (३६ मतदार) आणि निलंगा येथील तहसील कार्यालयातील महसूल हॉल (३७ मतदार) येथे मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे.

***

संबंधित पोस्ट

चित्तोडा ग्रामपंचायत सरपंचांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत उपसरपंच-सदस्यांचा राजीनामा…

नवी मुंबई येथील सिडकोच्या अखत्यारीतील १४ स्थानके मध्य रेल्वे प्रशासनाकडे हस्तांतरित स्वातंत्र्य दिनाच्या शुभ मुहूर्तावर रेल्वे प्रवाशांना मोठी खुशखबर; प्रवास होणार अधिक सुखकर खासदार नरेश म्हस्के यांच्या पाठपुराव्याला मोठे यश…

शिवजयंतीनिमित्त ‘जय शिवाजी-जय भारत यात्रा’ उत्साहात;मान्यवरांचा सहभाग..

vishwatmaklokswamivarta

कॉर्पोरेट जिहाद’ संदर्भात झारखंडचे राज्यपाल पंतप्रधानांशी चर्चा करणार;हिंदु जनजागृती समितीने दिले निवेदन

भाजप जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या हस्ते मौजे सिरसवाडी येथे स्मशानभूमीचे भूमिपूजन

माणगांव येथे “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर” उत्साहात  संपन्न२,७४८ लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ, अनाथ लाभार्थ्यांत पोलीस शिपाई पदीनिवड झालेल्या युवकाचा विशेष सन्मान !

vishwatmaklokswamivarta