vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

ब्युटी पार्लर प्रशिक्षणाचा समारोप

ब्युटी पार्लर प्रशिक्षणाचा समारोप

 

बुलडाणा, प्रतिनिधी : ग्रामीण विकास मंत्रालय आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेतील ब्युटी पार्लर प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक के के. सिंग अध्यक्षस्थानी होते.

 

यावेळी आरसेटी संचालक संदीप पोटे उपस्थित होते. सदर प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक म्हणून रूपाली शिंदे होत्या. प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थ्यांना मोफत निवासी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. या प्रशिक्षणात 35 प्रशिक्षणार्थीनी सहभागी नोंदविला.

 

जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक के. के. सिंग यांनी, आरसेटी मार्फत घेण्यात येणाऱ्या विविध प्रशिक्षणातून प्रशिक्षण घेतल्यास, कमी भांडवलात चांगला व्यवसाय सुरू करता येतो. तसेच कमी खर्चात चांगला नफा मिळवता येतो. प्रशिक्षणार्थींनी व्यवसायातील समस्यांवर उपाय शोधण्याचे आवाहन केले. श्री. पोटे यांनी, आरसेटीचा मुख्य उद्देश कला समृद्ध लोकांना त्यांच्या कलेची जाणीव करून देणे आणि त्यांना मदत करणे हा आहे. त्यांनी त्यांच्या कलेमध्ये पारंगत होऊन स्वयंरोजगार मिळावा, यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे सांगितले.

 

ब्युटी पार्लर प्रशिक्षणात मॅनिक्युअर, फेशियल, वॅक्सिंग, थ्रेडिंग, हेअर कटींग, हेअर मसाज, ब्रायडल मेकअप, मेहंदी, नेलआर्ट, ब्लिचिंग, स्पा, हायलाईट याविषयी प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षक स्वप्नील गवई, श्रीकृष्ण राजगुरे, सहाय्यक मनिषा देव, प्रशांत उबरहंडे, कल्पना पोपळघट यांनी सहाय्य केले.

 

00000

संबंधित पोस्ट

पाटण आठवडी बाजारात मतदान जागृती

vishwatmaklokswamivarta

राज्य दहशतवाद विरोधी पथकाची यवतमाळ आणि अहिल्यानगर जिल्ह्यात २१ ठिकाणी शोधमोहिम, काहीजण चौकशीसाठी ताब्यात.

vishwatmaklokswamivarta

अमली पदार्थ विरोधी जनप्रबोधनासाठी गीत स्पर्धा, 51 हजाराचे बक्षीस- पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सांगली जिल्ह्यात फिरते लोकअदालतीचे आयोजन

जालना गणेश महासंघातर्फे भव्य कब्बडी व कुस्ती स्पर्धेचे आयोजन – अशोक पांगारकर–नामांकित मल्ल ठरणार आकर्षण @ रोख बक्षिसांची लयलूट @ क्रीडा रसिकांनी लाभ घ्यावा —

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी