vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

गँग कोणतीही असो, देवा भाऊंच्या राज्यात… भाजपच्या पोस्टर्सची एकच चर्चा

गँग कोणतीही असो, देवा भाऊंच्या राज्यात… भाजपच्या पोस्टर्सची एकच चर्चा

[ पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून कोयता गँगने धुमाकूळ घातला आहे. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही विरोधी पक्षनेते अजित पवार  यांनीही हा मुद्दा उचलून धरला होता. या प्रकरणाची पुणे पोलीस आयुक्तांनी ì⁹ गंभीर दखल घेत कारवाईचे आदेश दिले होते. यानंतर पुणे पोलीस अॅक्शन मोडमध्ये आली आहे. पुणे पोलिसांनी कारवाई करत कोयते उगारून दहशत पसरविणाऱ्या टोळक्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

 

याच पार्श्वभूमीवर भाजपने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ì यांचे कौतुक करत पोस्टरबाजी केली आहे. भाजप महाराष्ट्र या फेसबुक पेजवरुन ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. ‘जनतेची सुरक्षा हीच शिंदे फडणवीस सरकारची हमी!

राज्याचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यात यशस्वी कोम्बिंग ऑपरेशन. गुन्हेगारी आळा घालणारे केवळ युती सरकार, असे या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. तस यासोबत शेअर करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये हे कायद्याचे राज्य आहे,’ कोयत्याच नाही असा उल्लेख केला आहे.

 

काय म्हटलंय पोस्टरमध्ये?

 

“हे कायद्याचे राज्य आहे, कोयत्याच नाही, पुण्यात यशस्वी कोम्बिंग ऑपरेशन. दहशत माजवणाऱ्या कोयता गँगच्या धुमाकुळानंतर 3765 गुन्हेगारांची झाडाझडती पिस्तुलासह 145 कोयते जप्त. देवा भाऊंच्या राज्यात गँग कोणतीही असो, मुसक्या आवळल्या जातील!,” असे या पोस्टरमध्ये म्हटले आहे.

 

पुणे पोलीस अॅक्शन मोडमध्ये

 

दरम्यान, पुणे पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत कारवाई करुन कोयता गँगच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी युनिट 2 च्या पथकाने स्वारगेट डायस प्लॉट येथून अक्षय आप्पाशा कांबळे आरोपींकडून 9 कोयते ताब्यात घेतले आहे. तर 1 जानेवारी 2023 ते 12 जानेवारीपर्यंत युनिट 2 ने 185 कोयते आणि 70 आरोपींना ताब्यात घेतले.

संबंधित पोस्ट

महिला सक्षमीकरणावर राज्य सरकारचा भर–महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे,माणगाव येथे विविध विकासकामांचा लोकार्पण व शुभारंभ संपन्न

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 :लोकशाहीच्या उत्सवासाठी कर्मचारी मतदान साहित्य घेऊन रवाना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केली निवडणूक सज्जतेची पाहणी

vishwatmaklokswamivarta

खंडाळा घाटात 180 मीटर उंच स्टेड पुल एक्सप्रेस-वे-मार्गे मुंबई पुण्याला जोडणाऱ्या मिसिंग लिंक प्रकल्पा…

vishwatmaklokswamivarta

क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना प्रशिक्षणउच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती उच्च व तंत्र शिक्षण विभागातील ५०० हून अधिक प्राध्यापकांना दिले जाणार प्रशिक्षण..

जिल्हा परिषद निवडणूक विभाग पंचायत समिती निर्वाचक गण आरक्षण सोडत सोमवारी

vishwatmaklokswamivarta

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाचे दोन महत्त्वाचे निर्णय,सिंचन विहिरी दुरुस्तीसाठी मदत, नापीक जमिनी मनरेगातून लागवडीयोग्य करता येणार विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांचे तातडीने अंमलबजावणीचे निर्देश..

vishwatmaklokswamivarta