vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळी याच्या भावाचा शिवसेना प्रवेश झाला

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळी याच्या भावाचा शिवसेना प्रवेश…

 

मुंबई प्रतिनिधी

अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळी याचा भाऊ प्रदीप गवळी आणि माजी नगरसेविका वंदना गवळी यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षात प्रवेश झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. या वेळी गवळी यांच्या इतरही शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश होता

 

अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळी याचा भाऊ प्रदीप गवळी आणि माजी नगरसेविका वंदना गवळी यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना  पक्षात प्रवेश झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. या वेळी गवळी यांच्या इतरही शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश होता. दरम्यान, महाराष्ट्रातील इतरही अनेक ठिकाणी विविध कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदेयांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे.

प्रदीप गवळी आणि माजी नगरसेविका वंदना गवळी यांच्या पक्षप्रवेशाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: ट्विटरवरुन माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी ट्विटरद्वारे दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, ‘मुंबईतील भायखळा परिसरातील माजी नगरसेविका वंदना गवळी आणि प्रदीप गवळी यांच्यासह अखिल भारतीय सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला’ आहे. त्यासोबतच ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर विभागातील सेंचुरी रेयॉन कंपनीतील कर्मचाऱ्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला. या सगळ्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

एकनाथ शिंदे यांन या वेळी बोलताना म्हटले की, आमचं सरकार हे लोकांचं सरकार आहे. त्यामुळे आपल्या सर्व समस्या विचारात घेऊन आपले मार्गदर्शन करुन निर्णय घेतले जातील. मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो की, पाठिमागील सहा-सात महिन्यांमध्ये आपण बाळासाहेबांच्या विचारांच सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे जिल्हा, तालुका, गाव, खेडे अशा विविध ठिकाणांहून लोकांचा ओढा शिवसेनेकडे वाढत आहे. हे सर्व लोक शिवसेना पक्षात प्रवेश करत आहेत. याशिवाय महाराष्ट्राबाहेर असलेल्या लोकांचाही शिवसेनेमध्ये प्रवेश होतो आहे. हा आपल्यावर लोकांनी दाखवलेला विश्वास असल्याचेही एकनाथ शिंदे या वेळी म्हणाले.

 

Eknath Shinde – एकनाथ शिंदे
मुंबईतील भायखळा परिसरातील माजी नगरसेविका वंदना गवळी आणि प्रदीप गवळी यांच्यासह अखिल भारतीय सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

Image

Image

Image

Image

Eknath Shinde – एकनाथ शिंदे
@mieknathshinde

Follow

त्यासोबतच #ठाणे जिल्ह्यातील #उल्हासनगर विभागातील सेंचुरी रेयॉन कंपनीतील कर्मचाऱ्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला. या सगळ्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Image

Image

Image

Image

180
Reply
Share

संबंधित पोस्ट

सातारा जिल्ह्यातील वीर धरणातून २७ हजार ७९७ क्युसेक्स विसर्ग;नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे यांना जामीन नाकारण्यात आला

vishwatmaklokswamivarta

हिंगोली चे खासदार हेमंत पाटील यांच्याविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल..अधिष्ठात्याला टॉयलेट साफ करायला लावणे अंगलट

महाराष्ट्र मंदिर महासंघाचे प्रसिद्धीपत्रक ! उज्जैनच्या संतांच्या मागणीला मंदिर महासंघाचा जाहीर पाठिंबा ,गोमांस खाणारे व मूर्तीपूजा न मानणारे यांना मंदिरात प्रवेशबंदी करा ! – मंदिर महासंघ

vishwatmaklokswamivarta

विधानसभा निवडणूक २०२४-मतदानाचे महत्व स्वतः ओळखा आणि इतरांनाही सांगा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी देवगिरी महाविद्यालयात युवकांशी संवाद

vishwatmaklokswamivarta

कोल्हापूर येथील प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात ५० हून अधिक हिंदू संघटनांची उपस्थिती!शिवछत्रपतींचा अवमान सहन करणार नाही; ‘शिवाजी विद्यापिठा’च्या नामांतरासाठी राज्यव्यापी आंदोलनाचा निर्धार!

vishwatmaklokswamivarta