
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांची सुटका.आज सकाळी 11.30 वाजता इस्लामाबाद हायकोर्टात हजर राहणार आहेत.
विदेश प्रतिनिधी
माजी पंतप्रधान इम्रान खान यांची अखेर सुटका करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने त्यांची अटक बेकायदा ठरवली असून तातडीने सोडण्याचे आदेश दिलेत. या निकालामुळे इम्रान खान यांच्या समर्थकांनी जल्लोष केलाय. मंगळवारी इम्रान खान यांना अटक करण्यात आली. त्यानंतर कोठडीत आपल्याला एखाद्या दहशतवाद्याप्रमाणे वागणूक दिली, लाठ्या काठ्याने मारहाण केली, असे आरोप त्यांनी कोर्टात केले. आज सकाळी 11.30 वाजता इस्लामाबाद हायकोर्टात हजर राहणार आहेत.
इम्रान खान यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. इम्रान खान यांच्यावर अनेक भ्रष्टाचार, आर्थिक हेराफेरी, दहशतवाद, दंगली भडकवणे असे अनेक गुन्हे दाखल आहेत. पीटीआय सरकारच्या काळात अल कादिर ट्रस्टला काही प्रकरणात इम्रान खान यांनी मदत केली. या मदतीमुळे अल कादिर ट्रस्टला फायदा झाला पण सरकारचा लाखो रूपयांचा महसूल बुडाला. अल कादिर युनिव्हर्सिटीसाठी परवानगी देण्याच्या बदल्यात इम्रान खान यांना मोठया प्रमाणात जमीन देण्यात आली. या प्रकरणात इम्रान खान आणि त्यांच्या पत्नी बुशरा बिबी यांनाही आरोपी करण्यात आले.



