vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईतील गोरेगाव परिसरातील धक्कादायक घटना 14 वर्षीय मुलाचा शाळेच्या जलतरण तलावात बुडून मृत्यू …

 मुंबईतील गोरेगाव परिसरातील धक्कादायक घटना 14 वर्षीय मुलाचा शाळेच्या जलतरण तलावात बुडून मृत्यू.

मुंबई प्रतिनिधी

मुंबई येथील एका शाळेत धक्कादायक घटना घडली आहे. शार्दुल मधुकर आरोलकर नामक एका 14 वर्षीय मुलाचा शाळेच्या जलतरण तलावात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना घटना गोरेगाव पश्चिम येथील गोकुळधाम, यशोधाम स्कूलमध्ये घडली…

मुंबई येथील एका शाळेत धक्कादायक घटना घडली आहे. शार्दुल मधुकर आरोलकर नामक एका 14 वर्षीय मुलाचा शाळेच्या जलतरण तलावात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना घटना गोरेगाव पश्चिम येथील गोकुळधाम, यशोधाम स्कूलमध्ये घडली. शार्दुल याच्या मृत्यू नंतर विद्यार्थी, पालक आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या मुलाच्या मृत्यूसाठी शाळा प्रशासन आणि ट्रेनरच कारणीभूत आहे. त्यामुळे प्रशासन आणि संबंधीत ट्रेनरवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पालकांमधून केली जात आहे. काल (24 जून) दुपारी घडलेल्या या घटनेमुळे पालकांमध्ये संतापाची प्रचंड लाट उसळल्याचे पाहायला मिळाले.

शार्दुल हा आपल्या आई-वडीलांसोबत बोरीवली येथील योगीनगर परिसरातील शासकीय वसाहतीत राहायचा. त्याचे वडील संजय मधुकर आरोलकर हे दिंडोशी कोर्टात कामाला आहेत. तो यशोधाम स्कूलचा विद्यार्थी होता. स्कूलच्या गोकुळधाममध्ये एक स्विमिंग पुल आहे. ज्यात शार्दुल हा पाठिमागच्या सहा महिन्यांपासून पोहण्यासाठी जात होता. त्याचा पोहण्याचा प्राथमिक कोर्स सुरु होता. स्विमींग पुलामध्ये व्यवस्थापणाच्या वतीने चार स्विमिंग ट्रेनर कार्यकरत आहेत. जे विद्यार्थ्यांना पोहण्याचे शिक्षण देत असत

दरम्यान, संजय आरोलकर यांच्या पत्नीने त्यांच्या फोनवर शुक्रवारी (23 जून) दुपारी साडेबारा वाजता फोन केला. तसेच, मुलगा शार्दुल याला लाईफलाईन रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगितले. त्यामुळे संजय आरोलकर हे देखील तातडीने तेथे आले. मात्र, शार्दुलची प्रकृती गंभीर असल्याने त्याला नंतर शताब्द रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.

पोलिस तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार, शार्दुल याला पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे तो बुडू लागला. तो बुडत असल्याचे लक्षात येताच सागर नावाच्या ट्रेनरने त्याला पाण्याबाहेर काढले. मात्र, तो बेशुद्ध होत होता. या वेळी त्याला प्राथमिक उपचारानुसार उलटीद्वारे त्याच्या शरीरातील पाणी काढण्यात आले. मात्र, तो बेशुद्ध झाल्याने त्याला लाईफलाईन रुग्णालयात नेण्यात आले. पुढे रुग्णालयातच त्याचा मृत्यू झाला. शार्दुलच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार दिंडोशी पोलिसांनी मृत्यूची नोंद घेऊन तपास सुरु ठेवला आहे

संबंधित पोस्ट

मुंबईत 25 वर्षीय नौदलाच्या खलाशाने केली आत्महत्या, कुलाबा पोलीस तपास करत आहेत

vishwatmaklokswamivarta

श्रमजीवी संघटनेच्या आंदोलनाची यशस्वी सांगताजिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ९०५ वन हक्क दावेदारांना वनपट्टयांचे वाटपआदिवासी बांधवांबाबत शासन प्रशासन संवेदनशील    – जिल्हाधिकारी अशोक शिनगारेशासकीय यंत्रणेचे विवेक पंडित यांच्याकडून कौतुक  

राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया अंतर्गत उन्हाळी हंगाम 2024-25 अंतर्गत महाडीबीटी पोर्टल वर अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने नियोजन करणे आवश्यक—-जिल्हाधिकारी किशन जावळे*

संविधान व कायद्याच्या आधारे मार्गक्रमण केल्यास यशप्राप्ती- सचिव सतीश वाघोले

vishwatmaklokswamivarta

लातूर जिल्हा-लातूर जिल्ह्यात रात्रभर संततधार पाऊस सुरू असून खालील मार्गावर पुलावर पाणी आल्याने सदर मार्गावरील एस. टी.बस वाहतूक बंद विविध ठिकाणी पावसामुळे बंद असल्याने नागरिकांच्या माहितीकरिता