vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया अंतर्गत उन्हाळी हंगाम 2024-25 अंतर्गत महाडीबीटी पोर्टल वर अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ

राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया अंतर्गत उन्हाळी हंगाम 2024-25 अंतर्गत महाडीबीटी पोर्टल वर अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ

 

ठाणे, प्रतिनिधी:- राष्ट्रीय खाद्यतेल अभियान- तेलबिया (NMEO-OS) मध्ये उन्हाळी हंगाम 2024-25 अंतर्गत उन्हाळी भुईमूग व तीळ पिकांचे समूहांतर्गत 100 टक्के अनुदानावर प्रमाणित बियाणे वितरण, शेतकरी प्रशिक्षण व शेतीशाळा या बाबी राबविण्यात येणार आहेत.

या बाबींसाठी लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्जाद्वारे करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत भुईमूग पिकासाठी कोल्हापूर/ सातारा/ सांगली / पुणे/ अहिल्यानगर/ नाशिक / धुळे /छत्रपती संभाजीनगर या 8 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना व तीळ पिकासाठी जळगाव/ लातूर/ बीड/ बुलडाणा या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना लाभ द्यावयाचा आहे. यासाठी महाडीबीटीच्या https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/ या पोर्टलवर बियाणे, औषधे, खते या title अंतर्गत बियाणे घटकामध्ये भुईमूग किंवा तीळ पिकांसाठी प्रमाणित बियाणे वितरण या घटकासाठी अर्ज करण्यासाठी दि.7 फेब्रुवारी पासून ते दि.10 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती.

या योजनेंतर्गत अधिकाधिक शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी ही मुदत दि.13 फेब्रुवारी 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेंतर्गत लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी विभागीय कृषी सह संचालक / जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी / उप विभागीय कृषी अधिकारी / तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे संचालक (विस्तार व प्रशिक्षण) र.शा.नाईकवाडी यांनी कळविले आहे. 00000

संबंधित पोस्ट

महा वॉकेथॉन २०२६ – वॉक फॉर वॉटर’मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड· जिल्हा परिषद ते नवीन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत वॉकेथॉन

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातर्फे कर्जासाठी अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात १५ दिवस जमावबंदी* 

जालना मनपाच्या विभागांना जिल्हाधिकारी तथा आयुक्त आशिमा मित्तल यांनी दिला कालबद्ध कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

.म्हाडा लोगो गैरवापरप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई उभी करणारे लाखो शहरी कामगार आजही असुरक्षित, असंघटित आणि शोषणात्मक परिस्थितीत जीवन जगत आहेत. स्वच्छता कामगार, घरकामगार, ऑटो-रिक्षा चालक, फेरीवाले आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांना सरकार मूलभूत हक्क, सामाजिक सुरक्षा आणि सन्मानजनक जीवनापासून वंचित ठेवत असल्याचा गंभीर आरोप मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन