
उत्तर प्रदेशच्या अमरोहा परिसरात मोहरम मिरवणूकीत वीजेच्या झटकेमुळे दोन जणांचा मृत्यू, 52 जण गंभीर जखमेत…
उत्तर प्रदेश प्रतिनिधी
उत्तर प्रदेश मधील अमरोहा परिसरात वीजेचा झटका लागल्यामुळे 2 जणांचा वीजेचा झटका लागल्यामुळे मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेत 52 जखमी झाले आहेत.
उत्तर प्रदेश मधील अमरोहा परिसरात वीजेचा झटका लागल्यामुळे 2 जणांचा वीजेचा झटका लागल्यामुळे मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेत 52 जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या दोन दिवसांत मोहरम मिरवणूकीत दुसऱ्यांदा घटना घडली आहे. मोहरम मिरवणुकीत अलाम घेवून जाताना वीजेच्या संपर्कात आले. वीजेचा झटका भंयकर असल्याने या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. आणि या दुर्घटनेत 52 जण गंभीर जखमेत आहे. पोलिसांना या घटनेची माहिती देताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहे. गंभीर जखमेत असलेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मोहरम मिरवणूकीत दुर्दैवी घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.



