
हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनामुळे अनेक इमारती कोसळल्या. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल….
हिमाचल प्रतिनिधी
हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनामुळे अनेक इमारती कोसळल्या. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे
हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनामुळे अनेक इमारती कोसळल्या. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कुल्लू जिल्ह्यात भूस्खलन आणि मुसळधार पावसामुळे एकामागून एक इमारती कोसळत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. मुसळधार पावसामुळे राज्यात दरडी कोसळण्याच्या आणि पुराच्या घटना वारंवार घडत आहेत. परिसरात भूस्खलनामुळे अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे. राज्यात मुसळधार पाऊस आणि दरड कोसळल्याने महामार्ग आणि वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. या दुर्घटनेत अनेकांनी प्राण गमावल्याचे वृत्तांनी दावा केला आहे. काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. एकापाठोपाठ ७ इमारती कोसळल्या आहे.



