
कापुरबावडी वाहतुक उपविभागाचे हद्दीत साई जलाराम प्रतिष्ठान तर्फे गोपाळकाला निमित्त दहिहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्त या परिसरातील वाहतुकीत दि. 7 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10.00 ते रात्रौ 22.00 वाजेपर्यंत बदल करण्यात आले असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभाग पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार मे. राठोड यांनी दिली आहे.
ठाणे, प्रतिनिधी :- कापुरबावडी वाहतुक उपविभागाचे हद्दीत साई जलाराम प्रतिष्ठान तर्फे गोपाळकाला निमित्त दहिहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्त या परिसरातील वाहतुकीत दि. 7 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10.00 ते रात्रौ 22.00 वाजेपर्यंत बदल करण्यात आले असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभाग पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार मे. राठोड यांनी दिली आहे.
वाहतुकीत बदल पुढील प्रमाणे :-
प्रवेश बंद :- साकेतकडून बाळकुम मार्गे कशेळीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना साकेत कॉम्प्लेक्स जवळील महालक्ष्मी मंदिर येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे.
पर्यायी मार्ग :- सदरची वाहने साकेत कॉम्प्लेक्स जवळील महालक्ष्मी मंदिर येथून डावे वळण घेवून साकेत पंक्चर येथून नाशिक – मुंबई महामार्गाने इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद :- कशेळीकडून बाळकुम मार्गे साकेत कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना बाळकुम नाका येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे.
पर्यायी मार्ग :- सदरची वाहने कशेळी येथून सरळ पुढे जावून कापूरबावडी सर्कल मार्गे इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद :- माजिवडा गावातून लोढा संकुलातून बाहेर पडून बाळकुम कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना लोढा संकुल येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे.
पर्यायी मार्ग :- सदरची वाहने लोढा संकुल येथून उजवे वळण घेवून ग्लोबल हॉस्पिटल कडून साकेत कॉम्प्लेक्स, महालक्ष्मी मंदिर येथून उजवे वळण घेवून साकेत पंक्चर येथून नाशिक-मुंबई महामार्गाने इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद :- नाशिक-मुंबई महामार्गावरून साकेत पंक्चर येथून डावे बाजूस वळण घेवून साकेत कॉम्प्लेक्स कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना साकेत पंक्चर येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे.
पर्यायी मार्ग :- सदरची वाहने नाशिक-मुंबई महामार्गाने सरळ पुढे जावून गोल्डन नाका मार्गे इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद :- मुंबई-नाशिक महामार्गावरून साकेत कट येथून डावे बाजूस वळण घेवून बाळकुम कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना साकेत ब्रिजखाली प्रवेश बंद करण्यात येणार आहे.
पर्यायी मार्ग :- सदरची वाहने मुंबई-नाशिक महामार्गाने डावे वळण घेवून साकेत ब्रिजखालून साकेत कॉम्प्लेक्स, महालक्ष्मी मंदिर येथून उजवे वळण घेवून माजिवडा मार्गे इच्छित स्थळी जातील.
ही वाहतूक अधिसूचना दि. ०७ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी १०.०० ते रात्रौ २२:०० वाजेपर्यंत लागू राहील. ही अधिसुचना पोलीस वाहने, रुग्णवाहीका, फायर ब्रिगेड व अत्यावश्यक सेवेतील वाहने यांना लागू राहणार नाही असे ठाणे शहर वाहतूक विभाग पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार मे. राठोड यांनी कळविले आहे.
00000000



