vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

दिल्लीमध्ये संसदेच्या विशेष अधिवेशनाचा आज तिसरा दिवस: महिला आरक्षण राजीव गांधी यांचं स्वप्न, नारी शक्ती वंदन विधेयकाला कॉंग्रेसचा पाठिंबा – सोनिया गांधी

दिल्लीमध्ये संसदेच्या विशेष अधिवेशनाचा आज तिसरा दिवस: महिला आरक्षण राजीव गांधी यांचं स्वप्न, नारी शक्ती वंदन विधेयकाला कॉंग्रेसचा पाठिंबा – सोनिया गांधी

 

नवी दिल्ली प्रतिनिधी

दिल्लीमध्ये संसदेच्या विशेष अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. या कामकाजाची सुरूवात लोकसभेमध्ये महिला आरक्षण विधेयक चर्चेने झाली आहे. कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी लोकसभेत बोलताना महिला आरक्षणाला काँग्रेसचा पाठिंबा देत असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी हे विधेयक राजीव गांधी यांचं स्वप्न असल्याचं म्हटलं आहे. हे विधेयक यापूर्वीही संसदेत आलं होतं पण मंजूर होऊ शकलेलं नाही. त्यामुळे आता हे लवकरात लवकर लागू करण्याची वेळ आली असल्याचं म्हटलं आहे.

 

देशभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून 15 लाख महिला नेत्या निवडून आल्या आहेत. राजीव गांधींचे स्वप्न आतापर्यंत अर्धेच पूर्ण झाले आहे. हे विधेयक मंजूर झाल्यास त्यांचं स्वप्न पूर्ण होईल अशी आशा त्यांनी बोलून दाखवली आहे. या विधेयकाची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी काँग्रेसची मागणी आहे. सरकारने या वेळ होईपर्यंत थांबवू नये. याआधी जात जनगणना करून या विधेयकात एससी-एसटी आणि ओबीसी महिलांनाही आरक्षण द्यावे. असंही  सोनिया गांधी यांनी सुचवलं आहे

दिल्लीमध्ये संसदेच्या विशेष अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. या कामकाजाची सुरूवात लोकसभेमध्ये महिला आरक्षण विधेयकावर झाली आहे. कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी लोकसभेत बोलताना महिला आरक्षणाला काँग्रेसचा पाठिंबा देत असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी हे विधेयक राजीव गांधी यांचं स्वप्न असल्याचं म्हटलं आहे.

नारी शक्ती वंदन या विधेयकानुसार लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण लागू केले जाईल.

 

संबंधित पोस्ट

मराठा आरक्षण मुद्दा: पुन्हा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या, परभणीतील दुसरी घटना

vishwatmaklokswamivarta

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भांडुप आणि वसईसह देशभरात ६७ ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन !गुरुपौर्णिमेच्या माध्यमातून समाजात हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात कृतीशील व्हा ! – हिंदु जनजागृती समिती

गुन्हे सिद्धतेकरिता ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ सुरू करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन**जिल्ह्याची परंपरा अधिक उज्वल करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे- पालकमंत्री शंभूराज देसाई* 

vishwatmaklokswamivarta

अखेरच्या ७२ तासांत राबवावयाच्या कायदा सुव्यवस्था उपाययोजनांचा आढावा…

vishwatmaklokswamivarta

सांगवी गावात दरडप्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सुधारित प्रस्ताव सादर करावा- मंत्री अनिल पाटील

vishwatmaklokswamivarta