vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

स्वच्छता ही सेवा – २०२३” अभियान ठाणे जिल्हा न्यायालय व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे उत्साहात संपन्न.

स्वच्छता ही सेवा – २०२३” अभियान ठाणे जिल्हा न्यायालय व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे उत्साहात संपन्न.

 

 

ठाणे प्रतिनिधी :- विधी व न्याय राज्यमंत्री, नवी दिल्ली तसेच मा. उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष अभय मंत्री तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री.ईश्वर सूर्यवंशी व ठाणे महानगरपालिका उपायुक्त श्री.गोदापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्वामीनारायण संस्थेचे अध्यक्ष श्री.दोडीया व संस्थेतील स्वयंसेवक यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ०१ ऑक्टोबर २०२३ रोजी जिल्हा व सत्र न्यायालय, ठाणे व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथील परिसरात “स्वच्छता ही सेवा- २०२३” हे अभियान उत्साहात संपन्न झाले.

 

“स्वच्छता ही सेवा-२०२३ अभियान राबविताना सर्वप्रथम सकाळी 0८.३० वाजता स्वच्छता अभियानाला सुरूवात करण्यात आली व संपूर्ण न्यायालयीन परिसराची स्वच्छता करण्यात आली. या स्वच्छता अभियानात मोटार अपघात दावा न्यायाधीकरण, ठाणे चे सदस्य एस.एन शाह, दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर), श्री.एस.के.फोकमारे, ३ रे सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) श्री.ए.एम.पाटणकर, 5 वे सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) श्री. जे.आर. मुलाणी, 6 वे सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) श्री. ए.सी डोईफोडे, 4 थे सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) श्री. ए.आर. शेंडगे, इतर न्यायिक अधिकारी, ठाणे महानगरपालिकेचे स्वच्छता अधिकारी श्री.मारूती कावळे व स्वामीनारायण संस्थेचे अध्यक्ष व स्वयंसेवक यांनी तसेच सर्व स्तरातील न्यायालयीन कर्मचारी यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होवून स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग घेवून हे अभियान यशस्वी केले.

संबंधित पोस्ट

अंगणवाडी आता फक्त पोषणाचे केंद्र नव्हे, तर उज्ज्वल, सक्षम आणि सुसंस्कारित भावी पिढी घडवण्याचे महत्त्वपूर्ण केंद्र बनल्या आहेत, अशा शब्दात जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी अंगणवाडी सेविकांच्या समर्पित कार्याचे कौतुक

vishwatmaklokswamivarta

५२ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनास विद्यार्थी व पालकांनी सहभागी व्हावे- मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे..

आपत्तीग्रस्तांसाठी केंद्र सरकार ने महाराष्ट्राला आर्थिक मदत जाहीर

vishwatmaklokswamivarta

कोपरखैरणे विभाग कार्यालयात अचानक भेट देत आयु्क्त डॉ.कैलास शिंदे यांनी केली कामकाज पाहणी,अधिकारी, कर्मचा-यांशी संवाद साधत लोकाभिमुख कार्यप्रणाली राबविण्याचे दिले निर्देश

vishwatmaklokswamivarta

मेरा लाईफ मेरा स्वच्छता अभियान** जी उत्तर महानगरपालिका आणि संगम प्रतिष्ठानचा सामाजिक उपक्रम संपन्न

vishwatmaklokswamivarta

मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर पुलाचे गर्डर बसविण्यासाठी पुणे वाहिनीवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार

vishwatmaklokswamivarta