vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मुंबईतील विलेपार्ले प्रेमनगर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला गती द्यावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबईतील विलेपार्ले प्रेमनगर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला गती द्यावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

मुंबई प्रतिनिधी मुंबईत असलेल्या विलेपार्ले प्रेमनगर येथे झोपडपट्टी पुनर्वसनाच्या जागेवर होत असलेली अतिक्रमणे तातडीने काढून यासाठी जबाबदार असलेल्या संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई करावी, असे निर्देश देतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथील पुनर्विकासाच्या कामाला गती देण्याचे निर्देश गृहनिर्माण विभागाला दिले.  मुंबईत कोणत्याही परिस्थितीत नव्याने झोपड्या आणि अनधिकृत बांधकामे होऊ नयेत यासाठी पालिका आणि पोलीस प्रशासनाने जागरूक राहून समन्वयाने कारवाई करावी, असेही मुख्यमंत्री म्हणाले. सर्वसामान्य, गोरगरीब नागरिकांना घरे मिळवीत म्हणून आपण निर्णय घेतले आहेत त्यामुळे विकासक विनाकारण अडवणूक करत असतील तर नियमानुसार लगेच कारवाई करा, असेही निर्देश त्यांनी दिले.

विलेपार्ले प्रेमनगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प व सांताक्रूझ खार पूर्व येथील शिवालिक व्हेंचर्सच्या प्रकल्पासंदर्भात आज सह्याद्री अतिथिगृह येथे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. माजी मंत्री रामदास कदम, गृहनिर्माणच्या अतिरिक्त मुख्य सचिव वल्सा नायर, झोपडपट्टी पुनर्वसनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, कुणाल सरमळकर, प्रेमनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेचे कृष्णा कदम व इतर प्रतिनिधी, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आदी उपस्थित होते.

प्रेमनगर एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्थेचा पुनर्विकास त्वरित करण्याच्या दृष्टीने गृहनिर्माण विभाग आणि झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाने योग्य ती पावले तातडीने उचलावीत तसेच याठिकाणाहून निष्कासित करण्यात आलेल्या १४०७ पैकी ८५० झोपडीधारकांना गेल्या आठ वर्षांपासून भाडे मिळालेले नाही. हे भाडे ६१ कोटी असून नव्याने निश्चित होणाऱ्या विकासकाकडून हे थकीत आणि पुढील भाडे नियमानुसार मिळाले पाहिजे अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. थकीत भाडे मिळत नसल्याच्या प्रश्नावरून उच्च न्यायालयात याचिकेवर सुनावणी प्रलंबित आहे. काही व्यक्ती येथील झोपडीधारकांची दिशाभूल करीत असून त्यांच्याकडून पैसेही घेत असल्याच्या तक्रारी आहेत त्यावर पोलिसांनी आर्थिक गुन्हे शाखेमार्फत लगेच कारवाई करावी, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

संबंधित पोस्ट

धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज किनारी मार्गावरील संगीत रस्त्याचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

राज्याला सुख समाधानाचे दिवस आणि बळीराजाची कृपा यासाठी  साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 महत्वकांक्षी योजना.सप्टेंबर २०२५ पर्यंत ५००० मेगावॅटचे प्रकल्प पूर्ण करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस..

नवी मुंबई महानगरपालिकेच्या विविध नागरी सुविधा आणि प्रकल्पां मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण व भूमिपूजन संपन्न

vishwatmaklokswamivarta

पहिल्या पर्यावरणीय शाश्वतता शिखर परिषदेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्धाटन,राज्यात १० लाख हेक्टर क्षेत्रावर बांबूची लागवड होणार  – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

राज्यातील पहिलाच उपक्रम; बंदीजनांसाठी कारागृहातच कौशल्य विकास प्रशिक्षणास सुरुवात..