vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानप्रदेश

आस्थापनांना त्रैमासिक विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन

आस्थापनांना त्रैमासिक विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन

 

            जालना प्रतिनिधी (जिमाका) :- सेवायोजन कार्यालये (रिक्तपदाची सुचना देणे सक्तीचे) कायदा 1959 व त्या अंतर्गत नियमावली 1960 मधील तरतूदीनूसार जिल्ह्यातील सर्व आस्थापनांनी जून 2023 या अखेर आपल्या वेतन पटावर असलेल्या सर्व मनुष्यबळाची माहिती ई-आर 1 विवरणपत्र 31 जानेवारी 2024 पर्यंत www.rojgar.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करणे बंधनकारक आहे. अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भुजंग रिठे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

 

सार्वजनिक क्षेत्रातील केंद्र व राज्य शासन यांची सर्व कार्यालये,‍ ‍अंगिकृत उद्योग / व्यवसाय / महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत ‍ समिती, महानगर पालिका, नगरपालिका, तसेच खाजगी क्षेत्रातील 25 किंवा अधिक लोक काम करतात अशा सर्व आस्थापना, उद्योग, व्यापार, व्यवसाय, कारखाने यांना सेवायोजन कार्यालये ( रिक्तपदाची सुचना देणे सक्तीचे ) कायदा 1959 व त्या अंतर्गत नियमावली 1960 नुसार त्रैमासिक विवरणरपत्र ई-आर 1 माहे डिसेंबर 2023 तिमाही संपल्यानंतर 30 दिवसाच्या आत म्हणजेच दि. 31 जानेवारी 2024 पर्यंत सादर करणे बंधनकारक आहे.

 

नियोक्त्यांच्या लॉग-इनमध्ये विवरणपत्र www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाईन सादर करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. तरी याप्रमाणे नियोक्त्यांची जून 2023 या तिमाहीचे विवरणपत्र ई-आर 1 दि. 31 जानेवारी 2024 पर्यंत सादर करावे. यासाठी

 

www.rojgar.mahaswayam.gov.in वेबसाईट ओपन करुन, एम्प्लॉयर (लिस्ट अ जॉब ) वर क्लिक करुन एम्प्लॉयर लॉग इनमध्ये नियोक्त्यांचा युजर आयडी व पासवर्ड वापरुन लॉग इन करुन ईआर रिपोर्ट मधील ई-आर 1 या ऑप्शनवर क्लिक करुन ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे. माहिती भरतेवेळी काही तांत्रिक अडचण आल्यास किंवा अधिकच्या सहाय्यासाठी सोमवार ते शुक्रवार रोजी सार्वजनिक सुट्या वगळून सकाळी 10 ते सांयकाळी 6 वाजेपर्यत (02482) 299033 या कार्यालयाच्या दुरध्वनीवर संपर्क साधावा. तिमाहीचे विवरणपत्र ई-आर 1 सादर करण्यास कसूर झाल्यास कसूरदार आस्थापनांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

विधानसभा निवडणूक पूर्वपीठिका २०२४ चे प्रकाशन..

vishwatmaklokswamivarta

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात 120 उमेदवारांची प्राथमिक निवड  

vishwatmaklokswamivarta

वारणा धरणात 27.88 टी.एम.सी. पाणीसाठा

जिवती येथील शेतकऱ्यांच्या वन जमिनींच्या पट्ट्यांसंदर्भात बैठक घेणार- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मनुष्यबळाची त्रैमासिक माहिती नमुना ईआर-१ मध्ये३१ ऑक्टोबर पर्यंत सादर करावी

vishwatmaklokswamivarta

तबल्याचा ताल हरपला झाकीर हुसेन यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

vishwatmaklokswamivarta